मुळा-मुठा-भीमा नदीच्या पट्ट्यात ऊसलागवडीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:25+5:302021-05-18T04:10:25+5:30

शेतकरी मे महिन्याच्या शेवटी ऊस लागवडी करत असल्याची वस्तुस्थिती आहे पाण्याची उपलब्धतेनुसार शेतकरी उसाचे पीक हे घेत असतात. ...

Speed of sugarcane cultivation in the Mula-Mutha-Bhima river belt | मुळा-मुठा-भीमा नदीच्या पट्ट्यात ऊसलागवडीला वेग

मुळा-मुठा-भीमा नदीच्या पट्ट्यात ऊसलागवडीला वेग

Next

शेतकरी मे महिन्याच्या शेवटी ऊस लागवडी करत असल्याची वस्तुस्थिती आहे पाण्याची उपलब्धतेनुसार शेतकरी उसाचे पीक हे घेत असतात. या परिसरात गूळ बनविणारी गुऱ्हाळे असल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस हे गूळ बनवण्यासाठी गुऱ्हाळ चालक घेऊन जात असल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे चार पैसे मिळवून देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. ऊस लागवड ही सावड पद्धतीने केली जाते तसेच ऊस लागवडीचा दर हा मजूर वर्गाचा पाच हजार रुपये एकरी असा आहे. यामध्ये उसाचा पट्टा काढणे, उसाचे बेणे तोडून शेतात अंथरणे, उसाचे बेणे शेतात गाडणे असा मिळून एकरी पाच हजार रुपये शेतमजूर ऊस लागवडीसाठी घेत आहे. गेल्या वर्षीचा दर हा या वर्षी राहिल्यामुळे शेतकरी हा मजूर वर्गाकडून कामे करून घेत आहे. परंतु या भागात ऊस लागवडी चालू झाल्यामुळे मजूरवर्गाचा तुटवडा जाणवत आहे. तसेच शेतकरी वर्ग हा ऊस बेणे प्लॉट टननुसार घेत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही ऊस बेण्याचे चार पैसे मिळत आहे. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरीवर्ग शेतातील लागवडी व इतर कामे करण्यास गुंतलेला आहे.

शेतातील कामे करण्यासाठी मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक शेतकरी एकमेकांना सावड पद्धतीने शेतातील कामकाज करून घेत आहे.

Web Title: Speed of sugarcane cultivation in the Mula-Mutha-Bhima river belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.