एकाच वेळी दोन प्रवाशांकडे सापडली काडतुसे, पुणे विमानतळावर खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 11:05 AM2019-01-10T11:05:20+5:302019-01-10T11:15:22+5:30
पुणे विमानतळावर पहाटे एकाचवेळी दोन प्रवाशांच्या सामानांमध्ये काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने या प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
पुणे - पुणे विमानतळावर पहाटे एकाचवेळी दोन प्रवाशांच्या सामानांमध्ये काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. विमान प्रवासात रिव्हॉल्व्हर अथवा काडतुसे घेऊन जाण्यास मनाई आहे. असे असताना प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने या प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील (58) नावाचे प्रवासी पुण्याहून स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाने बंगळुरूला जात होते. त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली जात असताना त्यांच्या बॅगेत 22 काडतुसे आढळून आली. हा प्रकार पहाटे पावणेपाच वाजता लक्षात आला. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी पाटील यांना थांबवून ठेवून सामानासह विमानतळ पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पाटील यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना असून नजर चुकीने सामानात हे 22 काडतुसे आल्याचे त्यांची सांगितले. त्यांच्या सामानात केवळ काडतुसे असून रिव्हॉल्व्हर नव्हते.
At about 4:45 am today, SpiceJet Staff detected 22 live rounds of .22 caliber from baggage of a passenger bound for Banglore by SpiceJet flight No. SG-519 at Pune airport. He couldn't produce any valid document & has been handed over to Police by airline for further legal action pic.twitter.com/P1sv9PE0KQ
— ANI (@ANI) January 10, 2019
दुसरे प्रवासी भगवान चरणसिंह (60) हे पुण्याहून दिल्लीला जाणार होते. त्यांच्याही सामानात त्याच दरम्यान 2 काडतुसे आढळून आली. त्यांनाही विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. भगवान चरणसिंह हे रेल्वेत एक्सप्रेसचे चालक आहेत. त्यांचा मुलगा वाघोली येथील आयटी पार्कमध्ये नोकरीला आहे. त्यांच्या सामानात काडतुसे आढळल्याने ते एकदम घाबरुन गेले असून ही काडतुसे कशी आली हे त्यांना सांगता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले.