स्वच्छ सर्वेक्षणावरच पिचकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 01:30 PM2018-12-18T13:30:27+5:302018-12-18T13:32:30+5:30

स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याला प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर करण्यासाठी पालिकेचा अाटापिटा सुरु असताना काही समाजकंटक रंगविलेल्या दुभाजकांवर पिचकारी मारत असल्याचे चित्र अाहे.

spitting on the dividers on which swachh bharat survey adv painted | स्वच्छ सर्वेक्षणावरच पिचकारी

स्वच्छ सर्वेक्षणावरच पिचकारी

googlenewsNext

पुणे : स्वच्छ सर्वेक्षण 2019 साठी पुणे महानगरपालिकेकडून जय्यत तयारी करण्यात येत अाहे. सर्व रस्ते फुटपाथ, दुभाजके चकाचक करण्यात येत अाहेत. काेणी अस्वच्छता पसरवत असेल तर अॅपच्या माध्यमातून त्याबाबत माहिती देण्याचे अावाहनही करण्यात अाले अाहे. पुण्याला देशात एक नंबरचे स्वच्छ शहर करण्याचा मानस पालिकेने केला अाहे. परंतु ज्या नागरिकांच्या सहभागाशिवाय पुण्याला स्वच्छ करणे शक्य नाही त्याच नागरिकांचा पालिकेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र अाहे. पालिकेकडून संचेती पुलाच्या दुभाजकाला रंगवून त्यावर स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी हाेण्यासाठी अावाहन केले जात असतानाच काही मिनिटापूर्वीच रंगवलेल्या दुभाजकांवर काही समाजकंटक पिचकाऱ्या मारत अाहेत. त्यामुळे पालिकेने कितीही प्रयत्न केले तरी नागरिक पालिकेला साथ देणार का असा प्रश्न निर्माण झाला अाहे. 

    स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण संपूर्ण देशभरात करण्यात येते. यातून भारतातील सर्वाेत स्वच्छ शहरांची यादी करण्यात येते. मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणात पुणे शहराने पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकावला हाेता. यंदा पुण्याला प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर करण्यासाठी पालिका कामाला लागली अाहे. 2 नाेव्हेंबर पासून रस्त्यावर थुंकणारे, कचरा फेकणारे, लघवी, शाैचास बसणारे यांच्यावर धडक कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात अाला. इतकेच नाहीतर महापालिकेती भिंतींवर थुंकणाऱ्यांवर देखील पालिकेने कारवाई केली. असे असताना अाता शहरातील दुभाजकांना रंगविण्याचे काम पालिकेकडून करण्यात येत अाहे. संचेती पुलाचे दुभाजक रंगवून त्यावर स्वच्छ सर्वेक्षणाबाबत माहिती देण्यात अाली अाहे. तसेच पुण्याला प्रथम क्रमांचे स्वच्छ शहर करण्याचा मानस देखील व्यक्त करण्यात अाला अाहे. परंतु काही समाजकंटकाकडून या रंगवलेल्या दुभाजकांवरच पिचकारी मारण्यात येत अाहे. त्यामुळे काही मिनिटापूर्वी रंगवलेले दुभाजक मारलेल्या पिचकारीमुळे पुन्हा लाल हाेत अाहेत. 

    पालिका रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करत असली तरी पालिकेला सुद्धा मर्यादा अाहेत. पुण्याला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नागरिकांचा देखील सहभाग असणे अावश्यक अाहे. पालिकेने रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे काही प्रमाणात फरक पडला असला तरी प्रत्येक नागरिकाने पुण्याला स्वच्छ करण्यात सहभाग नाेंदविल्याशिवाय शहराल स्वच्छ करणे शक्य नाही. दुभाजक रंगविणाऱ्या कारागिरांच्या मेहनतीवर काही मिनिटातच पिचकारी मारण्यात येत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली अाहे. 

Web Title: spitting on the dividers on which swachh bharat survey adv painted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.