गावकीच्या राजकारणात विखुरले गट-तट

By Admin | Published: August 3, 2015 04:21 AM2015-08-03T04:21:48+5:302015-08-03T04:21:48+5:30

कासुर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. गावातील स्थानिक गट-तट निवडणुकीच्या राज

The splinter group in the politics of Gawaki | गावकीच्या राजकारणात विखुरले गट-तट

गावकीच्या राजकारणात विखुरले गट-तट

googlenewsNext

यवत : कासुर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. गावातील स्थानिक गट-तट निवडणुकीच्या राजकारणात स्पष्टपणे जाणवत असून, संपूर्ण जागांवर एकच पॅनल उभे न करता ठिकठिकाणी सोयीचे राजकारण करत स्वत:च्या वॉर्डापुरते बघत असल्याचे दिसून येत आहे.
एकूण १३ जागा असलेली कासुर्डी ग्रामपंचयतीमधील सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने मोठी चुरस निवडणुकीत दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांना लक्ष्मीदर्शनदेखील घडत आहे. १३ पैकी वॉर्ड क्र.३ मधून एका जागेवर वाल्मीक आखाडे बिनविरोध निवडून आले आहेत.
एकंदरीत परिस्थिती पाहता, तालुक्यातील इतर ग्रामपंचयतीमध्ये दिसणारे कुल व थोरात या गटा-तटाचे राजकारण कासुर्डी मधील गावकीच्या राजकारणात विखुरले गेले आहे.
वॉर्ड क्र.१ मध्ये ग्रामदैवत श्रीभैरवनाथ पॅनलचे-बापू ठोंबरे, छाया सोनवणे, श्रीभैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे-सखाराम तांबे, विजया सोनवणे व अपक्ष-अशोक होले यांच्यात लढत आहे.
वॉर्ड क्र.२ मध्ये ग्रामदैवत श्रीभैरवनाथ पॅनलचे-गुलाब वैरागे, रंजना ठोंबरे, श्रीभैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे-जनार्धन कसबे, कलावती ठोंबरे व अपक्ष-उत्तम सोनवणे यांच्यात लढत आहे.
वॉर्ड क्र.३ मध्ये श्रीभैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे-अमर अनपट, संदीपा आखाडे, जावजीबुवा विकास आघाडीचे-संतोष आखाडे, अलका राजवडे व इतर मयूर आखाडे, नलिनी राजवडे यांच्यात लढत आहे.
वॉर्ड क्र.४मध्ये श्रीभैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे-पांडुरंग आखाडे, दीपा जांभळे, कल्पना ठोंबरे, वाघजाई विकास आघाडीचे-मच्छिंद्र जगताप, मनीषा आखाडे, प्रतिभा भंडलकर यांच्यात सरळ लढत होत आहे.
वॉर्ड क्र. ५मध्ये श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे-सोपान गायकवाड, मंगल वीर, विजया सोनवणे, ग्रामदैवत श्रीभैरवनाथ पॅनलचे-बंडू गायकवाड, मनीषा आखाडे, जयश्री सोनवणे व अपक्ष-अशोक होले यांच्यात लढत आहे.
यवत : भरतगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन पॅनल व काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होत आहे.
विद्यमान आमदार राहुल कुल गटाचा जनसेवा पॅनल, माजी आमदार रमेश थोरात गटाचा भैरवनाथ पॅनल, तसेच भाजपा व इतर गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तयार केलेला भरतेश्वर पॅनल यांच्यात ग्रामपंचायतीसाठी चुरस आहे. एकूण ९ जागांसाठी २३ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. सरपंचपद इतर मागासवार्गासाठी राखीव आहे.
विद्यमान सरपंच विलास जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, बिभीषण जगदाळे, बापू थोरात यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलने सर्व वॉडॉत उमेदवार उभे केले आहेत, तर उत्तम टेमगिरे, अर्जुन टेमगिरे, प्रवीण इंगळे, दत्तात्रय टेमगिरे यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ पॅनलने सहा उमेदवार उभे केले आहेत. तर, भरतेश्वर पॅनलनेदेखील सहा उमेदवार उभे केले आहेत. दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड क्र.१ मधून जनसेवा पॅनलचे : विलास जगदाळे, वैशाली जगदाळे, संगीता जगताप, भरतेश्वर पॅनलचे नितीन ताम्हाणे, सविता थोरात, नंदा बारवकर व अपक्ष भीमाबाई ताम्हाणे यांच्यात लढत आहे. वॉर्ड क्र.२ मधून जनसेवा पॅनलचे : भाऊसाहेब कोलते, संगीता टेमगिरे, सरला विठ्ठल कारंडे, भैरवनाथ पॅनलचे : देविदास टेमगिरे, नंदा टेमगिरे, रेखा जाधव, भरतेश्वर पॅनलचे - चैत्राली गुलदगड, अंजना नवले, गोविंद डोंबाळे व अपक्ष - आनंद शेलार यांच्यात लढत आहे. वॉर्ड क्र.३ मधून जनसेवा पॅनलचे : गणेश कोळपे, गुलाब हाके, वैशाली हाके, भैरवनाथ पॅनलचे सावळाराम हाके, सुनीता जगताप, पप्पू हाके यांच्यात लढत आहे. (वार्ताहर)
 

Web Title: The splinter group in the politics of Gawaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.