कात्रज, कर्वेनगर, वारज्यात उत्स्फूर्त रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:57+5:302021-07-07T04:11:57+5:30
लोकमत ‘रक्ताचे नाते’ : रक्तदान महायज्ञ मोहीम लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे राज्यासह शहरात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला ...
लोकमत ‘रक्ताचे नाते’ : रक्तदान महायज्ञ मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे राज्यासह शहरात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोकमत ‘रक्ताचं नातं’ हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवित आहे. याला शहर व परिसरातून मोठा प्रतिसाद लाभत आहे.
रविवारी (दि. ४) वारजे-माळवडी, कात्रज-कोंढवा, तसेच कर्वेनगर येथे रक्तदान शिबिर पार पाडले. याला रक्तदात्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेविका सायली वांजळे मित्र परिवार, लायन्स क्लब ऑफ कात्रज, जलद सेवा ग्राहक संरक्षण परिषद, समता फाउंडेशन, मुंबई व कात्रजमधील हार्टबिट फाउंडेशन यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी शिबिर पार पडले.
कात्रज येथील माय माऊली केअर सेंटरमध्ये हे शिबिर पार पडले. या वेळी ३१ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला. या वेळी रक्तदात्यांस ‘लोकमत’कडून प्रमाणपत्र देण्यात आले. सहायक पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, प्रांतपाल हेमंत नाईक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नितीन एडके, माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक वीरसेन जगताप, सुनील कामटे, विकास मुंदडा, निखिल मुनोत, डॉ. ओंकार थोपटे आदी या वेळी उपस्थित होते. माय माऊली केअर सेंटरचे अध्यक्ष आणि लायन्स क्लब ऑफ कात्रजचे वरिष्ठ उपाध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
वारजे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सायली वांजळे मित्र परिवार व ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रविवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १७५ जणांनी सहभाग नोंदविला. अमृतवेल सोसायटीतील विरंगुळा केंद्रात रविवारी सकाळपासूनच नागरिकांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेविका सायली वांजळे, खडकवासला अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, भावना पाटील, माजी जि. प. सदस्य हर्षदा वांजळे, शुक्राचार्य वांजळे, मयुरेश वांजळे, आदित्य शिंदे, युवराज वांजळे, अतुल धावडे आदी या वेळी उपस्थित होते.
कर्वेनगर येथील प्रतिज्ञा मंगल कार्यालय येथे आयोजित रक्तदान शिबिरासही चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी ६० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. या वेळी गिरीष खत्री, शंतनू खिलारे, डॉ. अश्विनी गणपुले आदी उपस्थित होते.
कोट :
“लोकमतच्या सहकार्याने आयोजित ‘रक्ताचं नातं’ या चळवळीत आपण सर्वजण सहभागी होऊन एक मोठे कार्य पार पाडत आहोत. रोटरी क्लब पुणे यांचे फार मोठे योगदान या कार्यासाठी लाभले. सर्वांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक जबाबदारी अल्पस्वरुपात निभावता आली याचे समाधान आहे.”
-गिरीश खत्री