जिल्ह्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:09 AM2020-12-09T04:09:40+5:302020-12-09T04:09:40+5:30
पुणे : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारत बंद मध्ये सहभागी होत ठीकठीकाणी केंद्र शासनाविरोधात निदर्शने ...
पुणे : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारत बंद मध्ये सहभागी होत ठीकठीकाणी केंद्र शासनाविरोधात निदर्शने केली. जिल्ह्यातील अनेक महत्वाचे बाजार आंदोलनामुळे बंद राहिले.
केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या अंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. चाकण येथील बाजार बंद ठेवत शेतकऱ्यांनी केंद्र शासनाविरोधात आंदोलन केले. आळेफाटा, इंदापुर, बारामती, मंचर, जेजुरी, सासवड, राजुरी, उरूळी कांचन, दौंड, केडगाव या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निषेध आंदोलने करण्यात आले. तसेच अन्यायकारक कृषी कायदा रद्द करण्याची मागणी या वेळी आंदोलकांनी केली. बहूतांश बाजार बंद हाेते. मात्र, जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.