कदमवाकवस्ती येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:09 AM2021-07-15T04:09:56+5:302021-07-15T04:09:56+5:30
शिबिराचे उद्घाटन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या हस्ते झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस ...
शिबिराचे उद्घाटन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार घालून दीपप्रज्वलन करून रक्तदानास सुरुवात केली गेली. यावेळी बोलताना मोकाशी म्हणाले की, रक्तदान करणे व रक्तदान शिबिराचे आयोजन करणे ही दोन्हीही कार्य स्तुत्य उपक्रम असून सध्या कोविडच्या काळात समाजातील रक्ताचा होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी अशाच प्रकारे रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
मंडलाधिकारी गौरी तेलंग यांनीदेखील रक्ताच्या तुटवड्यामुळे कशा अडचणी येतात याबाबत एक अनुभव सांगितला. या शिबिरात ३० नागरिकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास लोणी स्टेशन येथील एका पायाने अपंग असलेला मनोज गायकवाड नागरिकांच्या लक्ष केंद्रित करताना दिसला. एक पाय नसतानादेखील रक्तदान करण्यासाठी तो एकटा सकाळी लवकर उपस्थित राहिला.
या वेळी बोलताना मनोजने सांगितले की गेल्या आठ वर्षांपासून परिसरातील प्रत्येक रक्तदान शिबिरास जाऊन तो रक्तदान करतो. या वेळी उपस्थित मान्यवरांकडून त्याचे कौतुक करण्यात आले.
या शिबिरास करण पवार, राम भंडारी,रविंद्र काळभोर,दीपक आडाळे,शेरखान पठाण,नासिरखान पठाण,ज्ञानेश्वर नामुगडे,विजय बोडके,रामदास कुंजीर,एजाज पठाण,अमोल खोले, शब्बीर पठाण, अतुल शिंदे यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पुणे शहर गुन्हे शाखा क्रमांक सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, मंडलाधिकारी गौरी तेलंग, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर, कदमवाकवस्तीचे युवा नेते चित्तरंजन गायकवाड, पोलीस पाटील प्रियंका भिसे, भाजप लोणी काळभोर शहर अध्यक्ष कमलेश काळभोर, भाजप नेते प्रवीण काळभोर, कळंबा केसरी मनोज काळभोर,
ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, नागेश काळभोर, अमित काळभोर, हरिष गोठे, श्रीकांत भिसे, शिवसेनेचे संतोष भोसले, निलेश काळभोर यांनी उपस्थिती दर्शवली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारणी सदस्य शरद पुजारी, हवेलीचे अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, उपाध्यक्ष गणेश धुमाळ, कार्याध्यक्ष तुषार काळभोर, सरचिटणीस ज्ञानेश्वर शिंदे, सचिव विजय रणदिवे, सहसचिव दिगम्बर जोगदंड यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात सूत्रसंचालन कमलेश काळभोर यांनी केले, तर आभार विजय रणदिवे यांनी मांडले.
--
फोटो क्रमांक : १४कदमवाकवस्ती रक्तदान शिबिर
फोटो लाइन- रक्तदान शिबिरास कौतुकास पात्र ठरलेले मनोज गायकवाड.