राज्य राखीव पोलीस दलाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:40+5:302021-07-19T04:08:40+5:30
पुणे : ‘लोकमत’ आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला पोलिसांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद ...
पुणे : ‘लोकमत’ आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला पोलिसांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ येथील अलंकारन हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन समादेशक मंगेश शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी शिंदे यांनी सांगितले की, कोरोनाच्या या काळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा आहे. अशा वेळी ‘लोकमत’ने आयोजित केलेला रक्तदानाचा महायज्ञ अधिक कौतुकास्पद आहे. या वेळी सहायक समादेशक एल. एस. उत्तेकर, पोलीस निरीक्षक बी. पी. जाधव, पोलीस उपनिरीक्षक डी. एस तडाखे तसेच सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. जयंत भागवत, डॉ. अनघा पळसकर, डॉ. रजनी जाधव, डॉ. स्वाती साळवे, डॉ. अश्विनी भिलारे, डॉ. संगीता निकम आदी उपस्थित होते.
समादेशक मंगेश शिंदे यांनी स्वत: रक्तदान करीत सहकाऱ्यांना प्रोत्साहित केले. या रक्तदान शिबिरामध्ये ३ अधिकारी व ६६ पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.
..............
फाेटो -
राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ चे समादेशक मंगेश शिंदे रक्तदान करताना. समवेत अधिकारी व डॉक्टर.