काळूस येथे आरोग्य तपासणीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:55+5:302021-09-11T04:11:55+5:30

काळूस ग्रामपंचायत, विविध कार्यकारी विकास सोसायटी, शेतकरी संघटना, दिंडी मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काळूस व तज्ज्ञ डॉक्टरांच्या संयुक्त विद्यमाने ...

Spontaneous response of citizens to health check-up at Kalus | काळूस येथे आरोग्य तपासणीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

काळूस येथे आरोग्य तपासणीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Next

काळूस ग्रामपंचायत, विविध कार्यकारी विकास सोसायटी, शेतकरी संघटना, दिंडी मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काळूस व तज्ज्ञ डॉक्टरांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन खेड पंचायत समितीचे सभापती अरूण चौधरी, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, युवा नेते मयूर मोहिते, सरपंच धनश्री गणेश पवळे - पाटील, उपसरपंच यशवंत खैरे, चेअरमन बारकू जाचक, चेअरमन योगेश पवळे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबिरात सहभागी रुग्णांचे डोळे तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. ज्या नागरिकांना मधुमेह, पोटाचे व फुफ्फुसाच्या समस्या आहेत अशांची स्पेशल तज्ज्ञांनी तपासणी करून मोफत मार्गदर्शन केले. तसेच अपंग व दिव्यांग व्यक्तीसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन संबंधितांचे ऑनलाईन युनिक कार्ड फॉर्म भरून घेण्यात आले. दरम्यान नवनिर्वाचित सभापती अरुण चौधरी यांचा सत्कार केला. शिबिरात डॉ. प्रशांत शेलार, डॉ. दादासाहेब गारगोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. जी. जाधव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम जाधव, डॉ. दादासाहेब गारगोटे आदींचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक मोहनराव पवळे यांनी केले. सूत्रसंचालन नाथा पोटवडे यांनी तर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष पवळे यांनी आभार मानले.

१० शेलपिंपळगाव

काळूस (ता. खेड) येथे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

Web Title: Spontaneous response of citizens to health check-up at Kalus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.