राजुरी येथील नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:58+5:302021-09-23T04:11:58+5:30
या शिबिरामध्ये एकूण १६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये २६ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. त्यापैकी १९ रुग्णांना ...
या शिबिरामध्ये एकूण १६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये २६ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. त्यापैकी १९ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नारायणगाव येथील डॉ. डोळे रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती संकल्प संस्थेचे अध्यक्ष कलीम पटेल आणि डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. संदीप डोळे यांनी दिली.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार, जि. प. सदस्या आशा बुचके, अमित बेनके, पं. स. सदस्य दिलीप गांजाळे, दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, बाळासाहेब हाडवळे, बाळासाहेब औटी, काशिनाथ औटी, नीलेश हाडवळे, काशिनाथ हाडवळे, सादिक अत्तार, जयसिंग औटी, राजुरी मुसलमान जमातीचे अध्यक्ष जाकीर पटेल, ग्रामपंचायत सदस्य शाकीर चौगुले, अकबर पठाण, रईस चौगुले,इ.मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित
शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. अमोल बांगर,डॉ.परिक्षित टाके,विजय गायकवाड, कलीम पटेल,जिलानी पटेल, शाकीर चौगुले,अमीर शेख,सादिक शेख,मुजम्मिल पठाण,मोबीन पटेल,आरिफ पटेल, आदिल पटेल, बिलाल शेख,सूफियान मोमिन व सर्व संकल्प सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
--
२२राजुरी नेत्रतपासणी शिबिर