रानभाजी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:14 AM2021-08-15T04:14:40+5:302021-08-15T04:14:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे: कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विज्ञान केंद्र (नारायणगाव) यांचे संयुक्त विद्यमाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डिंभे: कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विज्ञान केंद्र (नारायणगाव) यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव मौजे राजपूर (ता. आंबेगाव) येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजन करून झाले.
रानभाजी महोत्सव आयोजन करण्यामागील महत्व व उद्देश प्रास्ताविकामध्ये तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी विषद केले. यानंतर कृषी विज्ञान केंद्र नारायणराव येथील शास्त्रज्ञ यादव यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व व औषधी गुणधर्म याबाबत महिला व शेतकरीवर्गाला माहिती दिली. या वेळी सौ. लोहकरे व राहीबाई उंडे यांनी रानभाजी ओळख व पाककृती याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कांताराम लोहकरे यांनी रानमेव्याचे पदार्थ याविषयी व अरविंद मोहरे यांनी रानभाजी संवर्धन या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास शेतकरी महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता. यात ४० विविध रानभाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. तसेच विविध रानभाज्यांची पक्वान्न यावेळी महोत्सवात सादर करण्यात आले. या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद व सहभाग नोंदविलेल्या सर्व महिला बचत गट व शेतकरी गटांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी लक्ष्मण मोहरे यांनी १० रानभाज्यांचे पक्वान्न बनवून प्रदर्शनात उपलब्ध करून दिले. या वेळी डिंभा मंडळातील सर्व कर्मचारी व पाबळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमास कमल लोहकरे सरपंच-राजपूर, चंद्रकांत उगले सरपंच-तळेघर, सीताराम जोशी, शशिकांत साळवे, सुनीता लोहकरे, दुंदा जढर, चंदर लोहकरे, उत्तम वाघमारे व महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ओळ : राजापूर (ता. आंबेगाव) येथील रानभाजी महोत्सवात महिला बचत गटांनी विविध रानभाज्यांचे प्रकार सादर केले.