बारामती नगरपरिषद शाळांना क्रीडा साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:49+5:302021-09-24T04:12:49+5:30

९० टक्के मागासवर्गीय विद्यार्थी असणाऱ्या शाळांना ही योजना लागू होती. यामध्ये ५२ प्रकारचे क्रीडा साहित्य उपलब्ध झाले. ...

Sports equipment for Baramati Municipal Schools | बारामती नगरपरिषद शाळांना क्रीडा साहित्य

बारामती नगरपरिषद शाळांना क्रीडा साहित्य

Next

९० टक्के मागासवर्गीय विद्यार्थी असणाऱ्या शाळांना ही योजना लागू होती. यामध्ये ५२ प्रकारचे क्रीडा साहित्य उपलब्ध झाले. त्यात प्रामुख्याने मैदानी खेळाचे साहित्य व खोलीतील बैठी खेळाचे साहित्यांचा समावेश आहे. प्रत्येकी शाळेला ३ लाख रुपयांचे साहित्य मिळाले आहे. त्यामध्ये शाळा क्र.१ ते शाळा क्र.८ प्राथमिक शाळेचा समावेश आहे. शिक्षण समितीमार्फत नगरसेविका मयुरी सूरज शिंदे यांनी क्रीडा साहित्यांची मागणी केली होती. जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे येथे सातत्याने पाठपुरावा केला. साहित्य उपलब्ध होण्यासाठी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. शिक्षण समिती सभापती बेबीमरियम बागवान, नगरसेविका मयुरी सूरज शिंदे व मुख्याध्यापक चव्हाण, ढोले यांना क्रीडा साहित्यांची पाहणी केली.

फोटो ओळ : बारामती नगरपरिषद प्राथमिक शाळांना क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

Web Title: Sports equipment for Baramati Municipal Schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.