जीवनात खेळाला खूप महत्त्व द्यावे : कटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:09 AM2021-04-05T04:09:28+5:302021-04-05T04:09:28+5:30

शांताराम बापू कटके मित्रपरिवारच्या वतीने आयोजित ग्रँड क्रिकेटिंग इव्हेंट व्हॅलेंटाईन 2021 स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. या ...

Sports should be given a lot of importance in life: Cutke | जीवनात खेळाला खूप महत्त्व द्यावे : कटके

जीवनात खेळाला खूप महत्त्व द्यावे : कटके

Next

शांताराम बापू कटके मित्रपरिवारच्या वतीने आयोजित ग्रँड क्रिकेटिंग इव्हेंट व्हॅलेंटाईन 2021 स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत वाघोलीमधील गृहनिर्माण संस्थेतील जवळपास 30 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या पाचव्या वर्षाचा मानकरी होण्याचा बहुमान आय. व्ही. याॅर्कर या संघाने पटकावला.यावेळी अनुक्रमे द्वितीय क्रमांक डी.ओ.सी या संघाने, तर तृतीय क्रमांक न्यू.ओ. राॅकस्टार या संघाने आणि चतुर्थ क्रमांक उमंग प्रीमियर संघाने पटकावला. या वेळी सामनावीर म्हणून घनश्याम शर्मा, उत्कृष्ट फलंदाज सुनील गाडे, उत्कृष्ट गोलंदाज नरेंद्र चौधरी तर उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून अंकुश अहिरराव यांनी यश मिळवले. वाघोली येथील अनंत ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सोमनाथ आव्हाळे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कार्यकारिणीचे सदस्य गणेश कुटे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाडळे, गणेश हरगुडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमनाथ आव्हाळे, आबिद शेख, शंकर खापने, सुहास इनामदार, अमोल शिवांगी, गणेश हरगुडे, विक्रम वाघमारे, ऋषिकेश गावडे, विजय भागवत, सोमनाथ कटके, आदिनाथ गाडे, अरविंद शेळके,दर्पण लाला, मुकेश चोभे, युवराज कटके, अक्षय गाडे, गणेश जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Sports should be given a lot of importance in life: Cutke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.