SPPU | कुलगुरूपदासाठी विद्यापीठातून १६ अर्ज; एप्रिलअखेर हाेणार कुलगुरूंची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:20 PM2023-04-01T12:20:50+5:302023-04-01T12:21:57+5:30

विद्यापीठाचे कुलगुरूपद मागील एक वर्षापासून रिक्त असून, प्रभारी कुलगुरूंची नेमणूक केलेली आहे...

SPPU 16 applications from the pune University for the post of Vice-Chancellor; The Vice-Chancellor will be selected at the end of April | SPPU | कुलगुरूपदासाठी विद्यापीठातून १६ अर्ज; एप्रिलअखेर हाेणार कुलगुरूंची निवड

SPPU | कुलगुरूपदासाठी विद्यापीठातून १६ अर्ज; एप्रिलअखेर हाेणार कुलगुरूंची निवड

googlenewsNext

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज करण्याची मुदत ३० मार्च राेजी संपली आहे. दरम्यान, कुलगुरू हाेण्यासाठी विद्यापीठातूनच १६ उमेदवार इच्छुक असल्याची माहिती समाेर आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरूपद मागील एक वर्षापासून रिक्त असून, प्रभारी कुलगुरूंची नेमणूक केलेली आहे.

माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ मे २०२२ मध्ये संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली हाेती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले. जानेवारी २०२३ मध्ये मुंबई, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीची स्थापना केली आणि त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या समितीने ३० मार्चपर्यंत कुलगुरूपदासाठी अर्ज करण्यास मुदत दिली हाेती.

कुलगुरू निवड समितीमध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अभय करंदीकर, दीपक कपूर, डॉ. मीना चंदावरकर (युजीसी प्रतिनिधी) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अर्जांमधून पात्र उमेदवारांच्या एप्रिल महिन्यांत मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यातून निवडलेल्या पाच उमेदवारांची कुलगुरू मुलाखत घेतील आणि त्यातून एकाची कुलगुरू पदावर निवड करणार आहेत.

इच्छुक असलेले उमेदवार

डाॅ. संजीव साेनवणे, डाॅ. विजय खरे, डाॅ. प्रफुल्ल पवार, डाॅ. अंजली कुरणे, डाॅ. राजेश गच्छे, डाॅ. विलास खरात, सुरेश गाेसावी, अविनाश कुंभार यांच्यासह १६ उमेदवारांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केले आहेत.

Web Title: SPPU 16 applications from the pune University for the post of Vice-Chancellor; The Vice-Chancellor will be selected at the end of April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.