SPPU | पुणे विद्यापीठात रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 09:37 AM2023-04-17T09:37:46+5:302023-04-17T09:38:54+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची काेणतीही लेखी परवानगी न घेता हे गाणे चित्रित केल्याचे समोर आले आहे...

SPPU | A case has been registered against a youth for filming a rap song in Pune University | SPPU | पुणे विद्यापीठात रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

SPPU | पुणे विद्यापीठात रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : विद्यापीठात रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी शुभम आनंद जाधव (वय २४, रा. जयभवानीनगर, पाषाण) याच्याविराेधात चतु:श्रृंगी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुधीर दळवी (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची काेणतीही लेखी परवानगी न घेता हे गाणे चित्रित केल्याचे समोर आले आहे. त्यांनी अनधिकृतपणे मुख्य इमारतीच्या संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सरस्वती हाॅलमध्ये प्रवेश केला. हेरिटेज बिल्डिंग वर्ग १ मध्ये तलवार, पिस्तुलाचा वापर करीत अश्लील शब्दांचा वापर सार्वजनिक ठिकाणी करत चित्रीकरण केले आणि चित्रफीत प्रसारित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

तरुणांनी सुरक्षा यंत्रणा भेदली कशी?

विद्यापीठ प्रशासनाची चित्रीकरणासाठी परवानगी नसताना तरुणांनी या ऐतिहासिक वास्तूमध्ये सुरक्षा यंत्रणा भेदून चित्रीकरण केलेच कसे? याप्रकरणी सुरक्षा विभागातील दाेषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: SPPU | A case has been registered against a youth for filming a rap song in Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.