SPPU: पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ तब्बल तीन तासांपासून बंद; विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 05:37 PM2021-09-30T17:37:19+5:302021-09-30T17:41:08+5:30

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विविध अभ्यासक्रमाचे ऑनलाईन व्हिडीओ उपलब्ध आहेत. हे व्हिडीओ पाहून विद्यार्थी काही विषयांमधील सखोल ज्ञान घेतात. आज संकेतस्थळ बंद असल्याने विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

sppu pune university website closed over three hours | SPPU: पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ तब्बल तीन तासांपासून बंद; विद्यार्थ्यांची गैरसोय

SPPU: पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ तब्बल तीन तासांपासून बंद; विद्यार्थ्यांची गैरसोय

googlenewsNext

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) संकेतस्थळ तब्बल तीन तासांपासून बंद आहे. एवढा काळ संकेतस्थळ बंद पडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना कोणतेही शैक्षणिक काम करता आले नाही. परिणामी त्यांच्याकडून रोष व्यक्त केला जात आहे.

संकेतस्थळ नेमके कशामुळे बंद?

गुरुवारी शहरातील काही  भागातील वीजपूरवठा खंडीत ठेवला जातो. परंतू जनरेटरवर संकेतस्थळ सुरू राहील याची खबरदारी घेतली जाते. मात्र केबलमधून होणारा वीजपूरवठा योग्य पद्धतीने होत नसल्याने विद्यापीठाने स्वतःहून संकेतस्थळ बंद ठेवले असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' अशी ओळख असलेल्या पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ बंद राहणे, हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यासाठी भुषावह नाही, अशी चर्चा आहे. एनआयआरएफ (नॅशनल इन्स्टिट्यूट रॅंकींग फ्रेमवर्क) रॅंकीगमध्ये देशात आणि राज्यात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या विद्यापीठाच्या संकेतस्थळाला रोज लाखो विद्यार्थी भेट देतात. सध्या विद्यापीठाच्या काही परीक्षा सुरू आहेत. परंतू सुदैवाने त्यासाठी विद्यापीठाचे सर्वर वापरले जात नाहीयेत. परीक्षांचे कामकाज वेगळ्या क्लाउडवर सुरू आहे. त्यामुळे संकेतस्थळ बंद असले तरी विद्यापीठांच्या परीक्षांना कोणतीही बाधा पोहचली नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अडथळा निर्माण झाला नाही. मात्र विविध कागदपत्रे, विद्यापीठाचे अभ्यासक्रम आदीबाबत माहिती घेण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जावे लागत असल्याने तिथे अडचणी निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विविध अभ्यासक्रमाचे ऑनलाईन व्हिडीओ उपलब्ध आहेत. हे व्हिडीओ पाहून विद्यार्थी काही विषयांमधील सखोल ज्ञान घेतात. आज संकेतस्थळ बंद असल्याने विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.  

Web Title: sppu pune university website closed over three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.