डेंग्यूचे डास वाढण्या आधीच धूर फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:10 AM2021-04-22T04:10:50+5:302021-04-22T04:10:50+5:30
कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे चिंताजनक असताना आता नीरा शहरात डेंग्यू लक्षणे असलेले ५ रुग्ण आढळून आले आहेत. ...
कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे चिंताजनक असताना आता नीरा शहरात डेंग्यू लक्षणे असलेले ५ रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षी याच काळात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर होती. डेंग्यू आणि कोरोनाची लक्षणे समान असल्याने डेंग्यू तपासणी बरोबरच कोरोनाची तपासणी ही करावी लागत आहे. त्यामुळे नीरा ग्रामपंचायतीने वेळीच दखल घेत धुरळणी करण्यात आली.
नीरा प्रभाग चार मध्ये ५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले. त्यामुळे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे व सदस्य शशिकला विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुरळणी करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच विजय शिंदे, अनिकेत सोनवणे यांच्या उपस्थित ग्रामपंचायतीचे कमगार राहुल झुंजार व इतर कर्मचाऱ्यांनी संध्याकाळच्या वेळी धूर फवारणी करून घेतली.