जेजुरीत कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशकांची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:22+5:302021-04-21T04:10:22+5:30
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले . जेजुरी शहरात दररोज सरासरी पंधराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तर ...
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले . जेजुरी शहरात दररोज सरासरी पंधराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तर परिसरात ही दररोज ४० ते ५० रुग्ण आढळून येत आहेत. जेजुरी शहर, विद्यानगर,लवथळेश्वर परिसर,जुनी जेजुरी,रेल्वे स्टेशन परिसर, जेजुरी एमआयडीसी, आयएसएमटी कॉलनी या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .
जेजुरी देवसंस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये सुमारे १३० बेड असल्याने रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. कोविडच्या या पार्श्वभूमीवर शहरात जंतुनाशकांची फवारणी,हायरिस्क ट्रेसिंग,सर्व्हेक्षण,कोव्हिड कचरा गोळा करणे व विल्हेवाट लावणे,भाजी बाजाराचे नियोजन,शहरातील अत्यावश्यक सेवा,दुकाने यांचे नियोजन,विना मास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई आदी उपाय योजना राबविली जात आहे . शहरातील हॉटस्पॉट परिसरात दररोज अग्निशमन बंबाच्या साह्याने जंतुनाशकांची फवारणी केली जात आहे . अग्निशमन विभागाचे रोहित लाखे,संतोष हरपळे, राहुल म्होरकर,अक्षय धुमाळ,हरीचंद्र जगताप हे सेवा बजावीत आहेत.
जेजुरीत अग्निशमन विभागाच्या वतीने जंतुनाशकांची फवारणी करताना.