शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर हिरवाईला येणार बहर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:42+5:302021-02-10T04:10:42+5:30

पुणे : झाड हेच माणसांचा श्वास असून, त्यामुळेच आपण जिवंत आहोत. म्हणून त्यांना जपणे आवश्यक आहे. झाडांचे महत्त्व छत्रपती ...

Spring will come on forts on Shiv Jayanti! | शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर हिरवाईला येणार बहर !

शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर हिरवाईला येणार बहर !

Next

पुणे : झाड हेच माणसांचा श्वास असून, त्यामुळेच आपण जिवंत आहोत. म्हणून त्यांना जपणे आवश्यक आहे. झाडांचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील सांगितले होते आणि गडकिल्ल्यांवर वृक्षराजी बहरू दिली होती. पण नंतरच्या काळात अनेक गडांवरील झाडे कमी झाली. आता पुन्हा गड-किल्ले हिरवाईने नटविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन येत्या शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

झाडांची मुळं ओलावा शोधत राहतात, तशी ती घट्ट होत जातात. तसेच झाडांवर प्रेम करणारे लोक एकमेकांना शोधून काढतात आणि एकत्र येतात. नातं घट्ट करतात. सह्याद्री देवराईच्या निमित्ताने आता वृक्षांसाठी काम करणाऱ्यांना एकत्र आणण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. या शिवसूर्याचा शिवनेरी गडावर जन्म झाला. आणि हा जन्मदिवस महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव म्हणून आपण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा करत असतो. प्रत्येक गडकिल्ल्यावर सुमारे ४०० रोपं लावण्यात येणार आहेत. चला तर मग शिवरायांना आपल्या जवळील गडकिल्ल्यावर, देवराईमध्ये तसेच जिथे गडकिल्ले नाही तिथे "वृक्षदिंडी" काढून ज्या झाडाची वृक्षदिंडी काढली, त्या झाडाच्या नावाने उदा. वडाच्या नावाने चांगभलं म्हणून झाड लावायचे आहे. त्याचे संगोपन करून, दरवर्षी शिवजयंती या जगवलेल्या झाडाच्या वाढदिवसाने साजरी करून "मानवंदना" देऊ या. आणि या छोट्या परंतु महत्त्वाच्या उपक्रमाचे फोटो, व्हिडीओची एक चित्रफीत तयार करून सहृ्याद्री देवराईकडे पाठवायचे आहे.

——————————————

शिवरायांचे गडकिल्ले बोडके झाले आहेत. त्यांना परत हिरवाईने फुलवूया. गडकिल्ल्यांवर देशी झाडे लावून शिवजयंती साजरी करूया. प्रत्येक शिवजयंतीला या झाडांचा वाढदिवस साजरा करू आणि शिवरायांना आगळेवेगळी मानवंदना देऊया.

- सयाजी शिंदे, ज्येष्ठ अभिनेते

——————————————

Web Title: Spring will come on forts on Shiv Jayanti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.