कालवाबाधितांना एसआरएची घरे - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:25 AM2018-10-02T01:25:55+5:302018-10-02T01:26:07+5:30

उर्वरित पंचनामे करण्याचे आदेश

SRI Homes to Kalabadithi - Girish Bapat | कालवाबाधितांना एसआरएची घरे - गिरीश बापट

कालवाबाधितांना एसआरएची घरे - गिरीश बापट

Next

पुणे : दांडेकर पुलाजवळ फुटलेल्या कालव्यामुळे बाधित झालेल्या उर्वरित नागरिकांचे पंचनामे करण्याचे काम येत्या मंगळवारी (दि. २) जिल्हा प्रशासनाने पूर्ण करावे, तसेच बाधितांपैकी अधिकाधिक नागरिकांना नियमाच्या चौकटीत राहून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) घरे देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे बाधितांना अन्न धान्य, गॅस व औषधे देण्याचे काम युद्धपातळीवर करावे, अशा सूचनाही बापट यांनी दिल्या.

कालवा दुर्घटनेनंतर केल्या जाणाºया उपाययोजनांचा गिरीश बापट यांनी आढावा घेतला. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. चोपडे आदी या आढावा बैठकीस उपस्थित होते. बापट म्हणाले, कालवा पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर कालव्याच्या गळतीचे काम केले जाणार आहे. तसेच लवकरच कालव्यातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर केले जाईल.

एसआरए योजने अंतर्गत बाधितांना घरे देता येतील का? याचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.सध्या राजेंद्र नगर परिसरात 556 सदानिका आहेत.
बाधित नागरिकांना तात्काळ उच्च प्रतिच्या गव्हाचे वितरण करावे.तसेच ज्यांना कमी प्रतिचा गहू दिला.त्यांना तो बदलून द्यावा,असे आदेश गिरीश बापट यांनी दिले.

तीन कोटींचा निधी पाच ते सहा दिवसांत मिळणार
कालवा दुर्घटना बाधितांच्या पुनर्वसनासाठी ३ कोटींचा निधी पुनर्वसन, वित्त विभागाकडून मंजूर झाला आहे. उपसमितीच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होईल.त्यानंतर पुढील पाच ते सहा दिवसांत राज्य शासनाकडून जिल्हाधिकाºयांकडे तीन कोटींचा निधी प्राप्त होईल, असे बापट यांनी स्पष्ट केले.

गॅस व औषधाचे वितरण
कालव्याच्या पाण्यामुळे काही नागरिकांचे गॅस सिलेंडर वाहून गेले, त्यामुळे स्थानिक गॅस एजन्सीच्या सहकार्याने सर्वांना गॅस उपलब्ध करून द्यावा,असे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार औषधे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही बापट यांनी नमूद केले.

मंगळवारी उर्वरित बाधितांचे पंचनामे
जिल्हा प्रशासनाचे 8 अधिकारी उर्वरित 50 ते 60 घरांचे पंचनामे करण्यासाठी मंगळवारी जाणार आहेत.पुनर्वसनाची प्रक्रिया करण्यास काही कालवधी द्यावा लागतो.तसेच पंचनामे झाल्याशिवाय हे काम करता येत नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

उंदीर,घुशी बाबत बापटांचे मौन
कालवा कशामुळे फुटला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.तसेच उंदीर, घुशी आणि खेकडे याबाबत मला काही बोलायचे नाही,असे गिरीश बापट यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

Web Title: SRI Homes to Kalabadithi - Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.