Ashadhi Wari: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा; स्वागतासाठी वरवंड सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 02:38 PM2024-07-02T14:38:36+5:302024-07-02T14:39:50+5:30
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन यांचा वतीने चोख पोलिस बंदोबस्त, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
वरवंड : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala) गुरुवारी (दि. ४) मुक्कामासाठी वरवंड येथे येत असून, या सोहळ्याच्या स्वागतासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांची जोरदार तयारी झाली असून, वरवंड येथे पालखी सोहळा मुक्कामी येत आहे. हा मुक्काम नवीन विठ्ठल मंदिर परिसरात आहे. या सोहळ्याच्या नियोजनाची तयारी प्रशासनाकडून चालू आहे. या पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन यांचा वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तसेच पालखी सोहळा तळावरील सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. (Ashadhi Wari)
या सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज असून, यासाठी गावात शौचालय १२०० युनिट, पालखी तळ, आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद केंद्र शाळा, श्री गोपीनाथ विद्यालय, श्री नागनाथ विद्यालय, ए.सी. दिवेकर विद्यालय, सिद्धार्थनगर, पुनर्वसन, श्री गोपीनाथ मंदिर, फिरते शौचालय मोबाइल युनिट याठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची टँकर भरण्याची सोय, खेडेकर विहीर व सातपुते विहीर, गावामध्ये रस्त्याला ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये लाइट बसविण्यात आले आहेत. मोबाइल चार्जिंग पॉइंट करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था गावातील शाळा-महाविद्यालयात, वसतिगृह याठिकाणी करण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेवक जालिंदर पाटील यांनी दिली आहे. ग्रामसेवक जालिंदर पाटील पालखी तळावरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत व गावात ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे चालू करून घेतले आहे. वारकऱ्यांचा मदतीसाठी मदत केंद्र ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी वारकरी संपर्क साधू शकेल.