श्रीलंकेचा अनुरा रोहना विजेता
By admin | Published: April 24, 2017 05:05 AM2017-04-24T05:05:36+5:302017-04-24T05:05:36+5:30
पुणे ओपन गोल्फ स्पर्धेत श्रीलंकेचा खेळाडू अनुरा रोहना याने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस कामगिरी करीत रविवारी विजेतेपद पटकावले.
पुणे : पुणे ओपन गोल्फ स्पर्धेत श्रीलंकेचा खेळाडू अनुरा रोहना याने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस कामगिरी करीत रविवारी विजेतेपद पटकावले.
पूना क्लबच्या गोल्फ कोर्सवर ही स्पर्धा झाली. अनुराने चार फेऱ्यांत २७४ चा स्कोअर केला. बेंगळुरूचा खलिन जोशी व अंगद चिमा यांनी प्रत्येकी २७६ स्ट्रोक्समध्ये चार फेऱ्या पूर्ण केल्या. ते संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी राहिले. २०१४मध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत त्याने विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर सुमारे ३ वर्षांच्या कालखंडाने ‘पीजीटीआय’मध्ये प्रथमच विजेतेपदाचा चषक उंचावला.
अखेरच्या चौथ्या फेरीत अनुराने धडाकेबाज कामगिरी करीत १८ होल पूर्ण केले. ही फेरी त्याने ६५ स्ट्रोकमध्ये पूर्ण केली. प्रारंभी अनुराचा खेळ अपेक्षेनुसार झाला नाही. नंतर मात्र त्याने स्वत:ला सावरत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविले.
अनुराकडून पहिल्याच होलवर बोगी नोंदली गेली होती. पहिल्या फेरीत त्याने ६ बर्डी आणि एका ‘ईगल’ची नोंद केली. चौथ्या फेरीत खलिनने अठरा गोल ६६ स्ट्रोक्समध्ये पूर्ण केले. त्याने सहा बडीर्ची नोंद केली. त्याच्याकडून एका बोगीची नोंद झाली. अंगदने ६९ स्ट्रोक्समध्ये चौथी फेरी पूर्ण केली. उदयन मानेने चौथ्या फेरीत चांगली कामगिरी केली. त्याने या फेरीत सहा बर्डींची नोंद केली. मात्र, पहिल्या फेरीत त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्याचा फटका त्याला फटका बसला. (क्रीडा प्रतिनिधी)