कुंजीरवाडी ग्रामपंचायतीवर सलग चौथ्यांदा श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेल सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:52+5:302021-01-20T04:11:52+5:30
:पुणे-सोलापूर महामार्गावरील महत्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या कुंजीरवाडी ग्रामपंचायतीवर श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन ...
:पुणे-सोलापूर महामार्गावरील महत्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या कुंजीरवाडी ग्रामपंचायतीवर श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे व माजी सरपंच संतोष (दादा) कुंजीर-पाटील यांच्या गटाने सलग चौथ्यांदा सत्ता राखली आहे. सचिन तुपे, संदीप धुमाऴ व संतोष कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेलने सतरापैकी नऊ जागा पटकावून सलग चौथ्यांदा सत्ता राखली आहे.
तर, माजी उपसरपंच भारत निगडे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक आघाडीने तीन, तर युवानेते संग्राम कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक आघाडीने तीन जिंकल्या आहेत. तर उर्वरित तीन जागांपैकी एक जागा शिवसेनेच्या पारड्यात गेली आहे. तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत.
श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे व संतोष कुंजीर यांच्या गटाच्या ताब्यात मागील पंधऱा वर्षापासून सत्ता आहे. ग्रामपंचायतीच्या सतरा जागांच्यापैकी एक महिला सदस्य बिनविरोध निवडून आल्याने, उर्वरित सोळा जागांच्यासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यात श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेलने सतरापैकी आठ जागा पटकावल्या. तर, बिनविरोध निवडुन आलेली महिलाही, श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेलची समर्थक आहे. यामुळे श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेलच्या निवडून आलेल्या सदस्यांची संख्या नऊवर पोचली आहे. शिवसेनेचे स्वप्नील कुंजीर व सुरेश कुंजीर यांच्या गटाला एक जागा मिळाली. तर युवानेते संग्राम मच्छिंद्र कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक आघाडीने तीन जागा जिंकल्या आहेत.
निवडून आलेल्या उमेदवारांची प्रभागनिहाय नावे. (कंसात पॅनेलचे नाव).
प्रभाग क्रमांक एक- आशा किसन कुंजीर, चंद्रकांत बबन मेमाणे, सुरेखा दत्तात्रेय गाढवे (श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेल),
प्रभाग क्रमांक - २ दीपक अनंता ताम्हाणे, अर्चना संदिप धुमाळ, अजय निवृत्ती कुंजीर (श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेल),
प्रभाग क्रमांक - ३ - गोकूळ निवृत्ती ताम्हाणे, कैलास प्रमोद तुपे (श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेल),
प्रभाग क्रमांक - ४ - अंजू गुलाब गायकवाड, लता अनिल कुदळे, सागर यशवंत निगडे (
माजी उपसरपंच भारत निगडे यांची आघाडी
प्रभाग क्रमांक 5- सारिका गिरीष भोंगळे, अलका संतोष कुंजीर, संग्राम मच्छिंद्र कोतवाल (युवा नेते संग्राम कोतवाल आघाडी).
प्रभाग क्रमांक - ६ :- हरेश शामराव गोठे (अपक्ष), साधना नाना कुंजीर (श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेल),व सुमन वसंत कुंजीर (शिवसेना).