एसएससी बोर्ड कार्यालयात तरुणीने घेतले पेटवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:23 AM2018-09-15T02:23:44+5:302018-09-15T02:24:01+5:30
प्रियकरासोबत वाद : ८० टक्के भाजल्याने उपचार सुरू; प्रियकराने दुसऱ्या मुलीसोबत केला विवाह
पुणे : प्रियकरासोबत वाद झाल्यानंतर शिवाजीनगर बसस्थानकाजवळ असलेल्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी) तिसºया मजल्यावरील स्वच्छतागृहात तरुणीने पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार झाला.
तरुणी यात ८० टक्के भाजली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पूनम जाधव (वय २५) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती कोंढव्यात राहते. एसएससी बोर्डातील लिपीक तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने दीड वर्षापूर्वी दुसºयाच मुलीसोबत विवाह केला. यावरून त्यांच्यात वाद सुरू होते.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तरुणी एसएससी बोर्डात आली. त्यानंतर थेट तरुण काम करीत असलेल्या तिसºया मजल्यावर गेली. तेथे तिची तरुणासोबत वादावादी झाली. यानंतर तिने तडक महिला स्वच्छतागृह गाठले. तेथे अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. तिच्या किंकाळ्यांनी कार्यालयातील सर्व कर्मचारी धावतच घटनास्थळी गेले. तेव्हा ती आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली होती. कर्मचाºयांनी तातडीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांना व रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. येथील कर्मचारी व अधिकाºयांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तसेच, पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. यात तरुणी ८० टक्के भाजली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. तक्रार देण्यास कोणी आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब वाघमळे यांनी दिली.