SSC Result Breaking : दहावीचा निकाल लागला रे... राज्याचा निकाल 99.95 टक्के तर कोकणचा 100 %

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 11:34 AM2021-07-16T11:34:03+5:302021-07-16T11:42:58+5:30

कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला.

SSC Resul Breaking: ssc result announced, state result 99.95 percent of maharashtra | SSC Result Breaking : दहावीचा निकाल लागला रे... राज्याचा निकाल 99.95 टक्के तर कोकणचा 100 %

SSC Result Breaking : दहावीचा निकाल लागला रे... राज्याचा निकाल 99.95 टक्के तर कोकणचा 100 %

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली.

पुणे - राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल  शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९९ .९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. 

कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले.  

नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

विभागिय मंडळ निहाय निकाल
पुणे  : ९९.६५
नागपूर :९९.८४
औरंगाबाद :९९.९६
मुंबई :९९.९६
कोल्हापूर :९९.९२
अमरावती :९९.९८
नाशिक : ९९.९६
 लातूर :९९.९६
कोकण :१००

परीक्षेसाठी बसलेले
विद्यार्थी     :     ९,०९,९३१
विद्यार्थिंनी  :     ७,४८,६९३
एकूण        :     १६,५८,६२४

निकाल पाहण्यासाठी लिंक : result.mh-ssc.ac.in
शाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in

Read in English

Web Title: SSC Resul Breaking: ssc result announced, state result 99.95 percent of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.