बापलेकासह चुलत्याचेही दहावीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 01:53 AM2018-06-11T01:53:19+5:302018-06-11T01:53:19+5:30

बारामती शहरात बापलेकासह चुलत्याने एकाच वेळी दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. बारामती नगर परीषद हद्दीतील जळोची परिसरातील कुटुंबाची यशोगाथा बारामतीकरांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.

SSC success News | बापलेकासह चुलत्याचेही दहावीत यश

बापलेकासह चुलत्याचेही दहावीत यश

googlenewsNext

बारामती - बारामती शहरात बापलेकासह चुलत्याने एकाच वेळी दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. बारामती नगर परीषद हद्दीतील जळोची परिसरातील कुटुंबाची यशोगाथा बारामतीकरांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.
यशाला कोणतीही वयाची अट नसते. येथील दत्तू भगवान गोसावी (वय ४३) यांनी दहावीच्या परीक्षेत ५२ टक्के, तर त्यांचा भाऊ अतुल भगवान गोसावी (वय २८) याने ४७ टक्के गुण मिळविले आहे. दोघा भावंडांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. कुटुंबीय आणि मित्रांच्या प्रोत्साहनामुळेच यश ळिाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. दत्तू गोसावी यांच्यासह त्यांचा भाऊ अतुलने हलाखीची परिस्थिती असल्याने शाळा सोडली. दत्तू यांनी १९९०-९१मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडली. अतुलनेदेखील मजुरी सुरू केली. तर दत्तू यांनी विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेत नोकरी केली. सन २००४ ाध्ये ते शिपाई या पदावर कायम झाले. भाऊ अतुल शिपाईपदावर नोकरीला लागला. शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा दोघांना स्वस्थ बसू देत नव्हती. दत्तू यांचे मित्र, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील दिलीप जमदाडे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. दोघा भावंडांनी बांदलवाडीच्या विजय बालविकास मंदिरामध्ये दहावीसाठी अर्ज भरला. अभ्यास सुरू केला. दत्तू यांचा मोठा मुलगा अभिजित हा देखील विद्या प्रतिष्ठान शाळेत १० वी मध्ये होता. बापलेकाबरोबरच चुलत्यानेही परीक्षेची तयारी केली.

आता लक्ष्य बारावीचे!
दोघा भावांनी मार्च २०१८मध्ये १०वी परीक्षा दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये दत्तू यांचा मुलगा अभिजितला ७१ टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे गोसावी कुटुंबाला या यशापुढे आकाश ठेंगणे वाटू लागले आहे. दहावीचे यश ही सुरुवात आहे. आता थांबायचे नाही, असा निश्चय दत्तू गोसावी यांनी केला आहे. दहावीनंतर आता बारावीच्या परीक्षेचा ध्यास त्यांनी घेतला आहे.

Web Title: SSC success News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.