Accident: खासगी चालकाकडून एसटीचा अपघात; एक दिवसाच्या प्रशिक्षणांनंतर दिले होते स्टेरिंग हातात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:01 PM2022-01-13T21:01:13+5:302022-01-13T21:01:25+5:30
सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून एसटीचे मात्र नुकसान झाले आहे
पुणे : इंदापूर - पुणे एसटी गाडीचा गुरुवारी सकाळी दहा वाजता हडपसर जवळ अपघात झाला. ह्या गाडीचे चालक हे नुकतेच एसटीत कंत्राटी पद्धतीने घेतलेले खासगी चालक होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून एसटीचे मात्र नुकसान झाले आहे.
एसटी चालविण्याचे केवळ एक दिवसाचे प्रशिक्षण देऊन खासगी चालकाच्या हाती एसटीचे स्टेरिंग देणे महागात पडले आहे. गुरुवारी सकाळी इंदापूर हुन पुण्याला येणाऱ्या एसटीचा ताबा खासगी चालकाच्या हाती देण्यात आला होता. गाडी अकराच्या सुमारास हडपसर जवळ आली असता समोरचा अंदाज न आल्याने समोरच्या टॅन्कर गाडीला एसटीने पाठीमागून ठोकले आहे. यात टँकर व एसटी चे नुकसान झाले आहे.
''अपघाता विषयी नेमकी माहिती नाही. मात्र अपघात हा किरकोळ स्वरुपाचा असणार आहे. मोठा असता तर तशा सूचना व माहिती मिळाली असती असे पुणे एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले.''