काळदरी घाटात एसटी बस कोसळली, झाडामुळे जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:32 AM2018-03-15T01:32:22+5:302018-03-15T01:32:22+5:30
पुरंदर तालुक्यातील काळदरी येथे सासवड येथून पानवडीमार्गे काळदरीकडे जात असताना घाटात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एसटी बस साधारण ६० फूट खोल दरीत कोसळली.
गराडे : पुरंदर तालुक्यातील काळदरी येथे सासवड येथून पानवडीमार्गे काळदरीकडे जात असताना घाटात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एसटी बस साधारण ६० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवाशांपैकी १६ जण किरकोळ जखमी झाले. जखमींना सासवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
सासवड पोलीस ठाण्यात मधुकर तुकाराम लडकत (वय ५४, रा. जेजुरी) या चालकावर निष्काळजीपणाने गाडी चालवून १५ जणांना दुखापत केली असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; पण बस आंब्याच्या झाडाला अडकल्यामुळे जीवितहानी टळली. जखमी प्रवाशांमध्ये भरत दशरथ परखंडे (वय ४0), दामोदर लक्ष्मण पिसाळ (वय ७0), रत्नाबाई महादेव राऊत (वय ६५), सुरेखा अंकुश परखंडे (वय ४५), सिंधूबाई अनंता जगताप (वय ६४), अनंता भिवा जगताप (वय ६८, सर्व राहणार काळदरी), रामदास सखाराम थोपटे (वय ६0), शांताबाई रामदास थोपटे (वय ६0), श्रीरंग मारुती गायकवाड (वय ७५, सर्व. राहाणार थोपवाडी), मारुती दगडू पवार (वय ७१, कुंजीरवाडी), गिरजाबाई रखमाजी बेंगळे (वय ६५), रखमाजी बापू बेंगळे (वय ७0), दादू मनोहर सूर्यवंशी (वय ६0, सर्व राहणार बहिरवाडी), हिराबाई शिवराम वाडकर (वय ६५, रा. रामवाडी), सुरेश पांडुरंग हराळे (वय ५६, रा. न्हावी, ता. भोर), मधुकर तुकाराम लडकत (वय ५४, रा. जेजुरी) हे वाहनचालक जखमी झाले आहेत.