एस.टी. को.ऑप. बँकेच्या गैरकारभारा विरोधात महाराष्ट्र एस.टी. कामगार कृती समितीचे आंदोलन

By अजित घस्ते | Published: July 4, 2024 05:20 PM2024-07-04T17:20:52+5:302024-07-04T17:21:27+5:30

९ व १० जुलै २०२४ ला मुंबई येथील आझाद मैदानवर एल्गार आंदोलनाचा इशारा

ST Co. Op. Maharashtra ST against the bank's mismanagement Agitation of Labor Action Committee | एस.टी. को.ऑप. बँकेच्या गैरकारभारा विरोधात महाराष्ट्र एस.टी. कामगार कृती समितीचे आंदोलन

एस.टी. को.ऑप. बँकेच्या गैरकारभारा विरोधात महाराष्ट्र एस.टी. कामगार कृती समितीचे आंदोलन

पुणे: एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली तीव्र नाराजी आहे. तसेच  एस.टी. को.ऑप. बँकेच्या गैरकारभारा विरोधात महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने  (दि.९ व १० जुलै २०२४  ) ला मुंबई येथील आझाद मैदानवर एल्गार आंदोलनाचा इशारा गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.  

राज्य विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दखल न घेतल्यास (दि.९ ) ऑगस्ट २०२४ क्रांतीदिनापासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने संदीप शिंदे यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे ,महाराष्ट्र एसटी कामगार सेना हिरेन रेडेकर, प्रदीप धुरंधर ,सुनील निरभवणे, दादासाहेब डोंगरे आनंद सानप आदी उपस्थित होते.

या आहेत एसटी कामगारांच्या प्रमुख मागण्या

- राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे रा.प. कामगारांना वेतन देण्यात यावे.
- कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचा-यांना देय होणारा महागाई भत्याचा दर त्या तारखेपासून रा.प. कामगारांना लागू करावा.
- एस.टी. कामगारांचे वेतन इतर महामंडळाच्या तुलनेत कमी आहे ही बाब विचारात घेऊन शासनाने कामगारांच्या सेवा कालावधीनुसार त्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्यात यावे.
- एस.टी. को.ऑप. बँकेत अॅड. सदावर्ते व त्यांच्या संचालकांनी केलेल्या गैरकारभाराची दखल घेऊन बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करावे.

Web Title: ST Co. Op. Maharashtra ST against the bank's mismanagement Agitation of Labor Action Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.