‘एसटी’ कमिटीकडून ‘आस्थापने’चा पंचनामा

By admin | Published: February 24, 2016 03:28 AM2016-02-24T03:28:08+5:302016-02-24T03:28:08+5:30

पंचायतराज कमिटीने पुणे जिल्हा परिषदेला दिलेल्या दणक्यानंतर आजपासून आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने पहिल्याच दिवशी शिक्षण व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना

'ST' committee's 'establishment' panchnama | ‘एसटी’ कमिटीकडून ‘आस्थापने’चा पंचनामा

‘एसटी’ कमिटीकडून ‘आस्थापने’चा पंचनामा

Next

पुणे : पंचायतराज कमिटीने पुणे जिल्हा परिषदेला दिलेल्या दणक्यानंतर आजपासून आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने पहिल्याच दिवशी शिक्षण व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे समजते. ही समिती चार दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आली असून बुधवारी विकासकामांचा आढावा घेणार आहे.
या समितीचे अध्यक्ष आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासह आमदार मधुकर पिचड, पास्कल धनारे, चंद्रकांत सोनवणे, संजय पुराम, नारायण कुचे, अशोक ऊईक, प्रभुदास भिलावेकर यांचा समावेश आहे.
सप्टेंबर महिन्यात पंचायत राज कमिटीने जिल्हा परिषदेला मोठा दणका दिला होता. हलगर्जीपणा, अनियमीतता, आणि सरकारी निधीचा अपव्यय, नियमबाह्य काम या प्रकरणी ठपका ठेवला होता. आता अनुसूचित जमाती कल्याण समिती चार दिवसांच्या दौऱ्यावर आली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी अस्थापना या विषयावर त्यांनी आढावा घेतला. यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य विभाग अधिकाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईवरून धारेवर धरल्याचे समजते.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, आमदार सुरेश गोरे, जयदेव गायकवाड, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, समाजकल्याण समितीचे सभापती अतिश परदेशी यांनी समितीचे अध्यक्ष म्हात्रे व अन्य सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित सर्व लोकप्रतिनिधीने विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा केली. त्याचबरोबर विविध प्रश्नांबाबत आपले निवेदन देखील दिले. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलीस अधिक्षक जय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'ST' committee's 'establishment' panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.