पुणे - नाशिक महामार्गावर एसटी चालकाला मारहाण; तर महिला कंडक्टरला नेले फरफटत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 01:17 PM2021-06-24T13:17:18+5:302021-06-24T13:23:58+5:30
खेड तालुक्यात पुणे - नाशिक महामार्गावर तुकाईभांबुरवाडी येथे ही घटना घडली
राजगुरुनगर: मला साईट का दिली नाही म्हणून एसटी चालकाला मारहाण करून महिला कंडक्टरला कारच्या बोनटवर १०० फुटापर्यत फरफटत नेले. ही घटना खेड तालुक्यात पुणे -नाशिक महामार्गावर तुकाईभांबुरवाडी येथे घडली आहे. याबाबत कार वरील अज्ञात चालकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात एसटी बस चालक सदु किसन भालेराव (वय. ४३ धंदा.नोकरी रा.खेड) या चालकाने एसटी चालकाने फिर्याद दिली
राजगुरुनगर आगाराची एस बस तुकाईभांबुरवाडी दरम्यान पुणे -नाशिक महामार्गावरून मंचर दिशेला जात होती. दरम्यान एसटी बसला मागून ओव्हर टेक करणाऱ्या कारने एसटी बसला आडवी उभी केली. कारमधून लाकडी काठी काढून एसटीची समोरील काच फोडली. चालक बाजूचा दरवाजा उघडून चालकाला मारहाण केली. त्यावेळी एसटी बस वरील कंडक्टर सारिका चिंचपुरे यांनी त्या कार चालकास ‘‘ तुम्ही असे करू नका आम्ही आॅन डयुटी आहेत. असे म्हणाले असता कार चालकाने ‘‘ मला साईड का दिली नाही, मला एक मर्डर करण्याचा आधिकार आहे. मी तुमच्या दोघाकडे बघून घेतो मी कोण आहे हे तुम्हाला दाखवितो ’’ असे म्हणून निघून जाऊ लागला. दरम्यान कंडक्टर चिंचपुरे यांनी आमचे आधिकारी येईपर्यंत कार चालकास थांबण्याची विनंती केली.
परंतु तो न थांबता निघून जाऊ लागला. म्हणून वाहक चिंचपुरे यांनी कारचा समोरील एक वायपर धरल्यावर त्याने कार थांबवली नाही. चिंचपुरे यांना जवळपास शंभर फुटापर्यंत परफटत नेले तेव्हा रस्त्याने जाणारे दुस-या गाडी वरील लोक हे मोठयाने ओरडल्याने त्याने कार थांबवली. वाहक चिंचपुरे हया खाली उतरल्यानंतर तो तिथुन पुढे मंचर बाजुकडे निघून गेला. अज्ञात चालका विरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण शिविगाळ,दमदाटी करून एस.टि बसची काच फोडली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फरारी कार चालकाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षा राणी घाटे करित आहे.