Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 13:03 IST2024-10-29T13:02:50+5:302024-10-29T13:03:08+5:30
एसटीचे मोठे नुकसान झाले असून १५ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी
डाळज (इंदापूर) : इंदापूर तालुक्यातील डाळज नं 2 या ठिकाणी पुणे सोलापुर महामार्गावर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला पाठीमागून जाऊन जोरदार धडक दिली. यामध्ये एसटीचे मोठे नुकसान झाले असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी लातूर वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. रात्री 1 च्या सुमारास एसटी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती ट्रेकला जाऊन धडकली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. गोविंद मांडे वय 38 लातूर ,निलूबाई मांदुर्गे वय 65 लातूर ,नाजूकबी 75 लातूर , रोहित मस्के वय 27 लातूर ,राहुल त्यागी वय 35 दिल्ली, इब्राहिम शेख वय 80 लातूर, महादेव सूर्यवंशी वय 70 उस्मानाबाद, रामराव सूर्यवंशी वय 75 लातूर, माधव अभगे वय 65 लातूर ,पार्वती अभगे वय 60 लातूर, राजकुमार मस्के वय 65 लातूर, मानसी घोडगे 11 लातूर ,संगीता घोडघे वय 32 लातूर व पंडित महादेव सावंत वय 45 उस्मानाबाद अशी त्यांची नावे आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची आपुलकीची सेवा या रुग्णवाहिकेने सर्व जखमींना भिगवण येथे रुग्णालयात दाखल केले.