एसटी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा!
By admin | Published: March 25, 2017 03:38 AM2017-03-25T03:38:11+5:302017-03-25T03:38:11+5:30
एसटी कामगारांच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला हरविलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि मोबाईल असा ११ हजार रुपयांचा ऐवज परत मिळाला.
भिगवण : एसटी कामगारांच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला हरविलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि मोबाईल असा ११ हजार रुपयांचा ऐवज परत मिळाला. भिगवण गावाच्या या कामगाराला त्याच्या प्रामाणिकपणामुळे सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी शाबासकी दिली.
भिगवण बारामती प्रवासादरम्यान प्रवास करीत असताना भिगवण परिसरातील महिलेचे पाकीट एसटीमध्ये गहाळ झाले. ही बाब घरी गेल्यावर महिलेच्या लक्षात आली. बारामती डेपोत कामगार असणारे सागर चंद्रकात जमदाडे यांना गाडीचे काम करीत असताना हा ऐवज सापडला. परंतु जमदाडे यांनी मोबाईल फोनच्या आधारे माहिती काढून हा ऐवज भिगवण परिसरातील असल्याचे माहिती करून घेतली. तसेच ही वस्तू जमदाडे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात जमा करून घडलेली माहिती दिली. यावर भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी नीलकंठ राठोड यांनी सदर महिलेस वस्तूबद्दल कल्पना देत वस्तू घेऊन जाण्यास सांगितले. महिला पोलीस ठाण्यावर आल्यानंतर जमदाडे यांच्या हाताने ती वस्तू महिलेला परत देऊन तरुणाचे प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करीत शाबासकी दिली. हरविलेला ऐवज परत मिळाल्याने जमदाडे यांचे आभार मानले.