दिवाळीत एसटीची भाडेवाढ; प्रतितिकीट ५० ते १५० रुपयांची दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:28 AM2023-11-07T09:28:00+5:302023-11-07T09:28:30+5:30

लांबपल्ल्याच्या गाडयांना १०० ते १५० रुपये जादा भाडे द्यावे लागणार

ST fare hike on Diwali Price increase from Rs.50 to Rs.150 per ticket | दिवाळीत एसटीची भाडेवाढ; प्रतितिकीट ५० ते १५० रुपयांची दरवाढ

दिवाळीत एसटीची भाडेवाढ; प्रतितिकीट ५० ते १५० रुपयांची दरवाढ

पुणे: दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या काळात एसटी महामंडळाकडून दिवाळी हंगाम काळासाठी तिकीट दरात सर्वच मार्गांतील गाडीवर १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या प्रवासासाठी सुमारे ५० रुपये, तर १०० ते १५० रुपये लांबपल्ल्याच्या गाड्यांना जादा भाडे द्यावे लागणार आहे. ही दरवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू हाेणार आहे. ८ ते २७ नोव्हेंबर या काळात परिवर्तनशील भाडे आकारणी केली आहे. यामध्ये साधी, जलद, निमआराम, शिवशाही या गाड्यांसाठी दरवाढ करण्यात आली आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

बसचे नियमित भाडे
प्रवास - शिवनेरी - शिवशाही - साधी बस (रुपये भाडे)

पुणे - नागपूर - २४०५ - १६०५ - १०८०
पुणे - नांदेड - १५५०- १०३५ - ६९५

पुणे - बीड - ८५५ - ५७० - ३८५
पुणे - सोलापूर - ८३५ - ५५५ - ३७५

पुणे - कोल्हापूर - ७७५ - ५२० - ३३०
पुणे - मुंबई - ५२५ - ३५० - २३५

पुणे - छत्रपती संभाजीनगर - ७५५ - ५०५ - ४६५
दिवाळीतील भाडेवाढ

प्रवास - शिवनेरी - शिवशाही - साधी बस
पुणे - छत्रपती संभाजीनगर - ७५५ - ५५५ - ३७५

पुणे - मुंबई - ५२५ - ३८५ - २६०
पुणे - कोल्हापूर - ७७५ - ५७० - ३८५

पुणे - नागपूर - २४०५ - १७७० - ११९०
पुणे - नांदेड - १५५० - ११४० - ७७०

पुणे - बीड - ८५५ - ६३० - ४२५
पुणे - सोलापूर - ८३५ - ६१५ - ४२५

सध्या सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले असल्याने खासगी बसला जादा भाडे द्यावे लागते. एसटीचा प्रवास स्वस्त आणि सुरक्षित म्हणून प्रवास केला जातो. मात्र त्याच्या भाड्यात दरवाढ झाल्याने भाडे परवडत नाही. त्यात पुणे ते नागपूरला अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. - प्रभू शिंदे, प्रवासी

Web Title: ST fare hike on Diwali Price increase from Rs.50 to Rs.150 per ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.