ग्रामीण भागातील एसटीची सेवा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:25+5:302020-12-15T04:28:25+5:30
-- कान्हुरमेसाई : एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी मुख्य शहरांना जोडणाऱ्या आणि महत्त्वाचा ठिकाणच्या प्रवासी सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे ...
--
कान्हुरमेसाई : एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी मुख्य शहरांना जोडणाऱ्या आणि महत्त्वाचा ठिकाणच्या प्रवासी सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सेवेवर मर्यादा आल्या आहेत कमी भार मानाची कोणती नवीन बस सेवा एसटी कडून सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथून शाळेसाठी कान्हुर मेसाई ते पाबळ तसेच कान्हूर मेसाई ते शिरूर येथे शिक्षणासाठी जाण्यासाठी आपल्या टू व्हीलर वर जीव मुठीत घालून शाळेसाठी जात असल्याचे चित्र कान्हूर मेसाई चिंचोली मोराची, खैरेवाडी, खैरेनगर आधी परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी जात असल्याचे दिसत आहे
दरम्यान या भागातील विद्यार्थ्यांकरीता शिरूर आगाराची शास्ता बाद येथे मुक्कामी असणारी एसटी सुरू करण्यात यावी जेणेकरून शास्ता बाद चिंचोली मोराची कान्हूर मेसाई खैरेनगर खैरेवाडी येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांना पाबळ येथे शिक्षणाकरिता जाण्याची सोय होईल . परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटीने प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी शासन निर्देशानुसार एसटी च्या सेवा महत्त्वाच्या शहरासाठी आणि मोठ्या गावासाठी सुरू केलेल्या एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे प्रवासी एका वेळी मिळतातच असे नाही. यामुळे ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्याची मागणी चिंचोली मोराची येथील उद्योजक केरू नाणेकर यांनी केली आहे.
--