ST Strike: पुण्यात प्रवाशांची होतीये लूट; खासगी ट्रॅव्हल्सकडून भाड्यात तिप्पट - चौपट दराने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 08:08 PM2021-11-07T20:08:21+5:302021-11-07T20:20:35+5:30

दिवाळीनंतर प्रवाशांचा परतीचा मार्ग ठरला त्रासदायक

st strike effect on pune passengers private travels increase ticket rates | ST Strike: पुण्यात प्रवाशांची होतीये लूट; खासगी ट्रॅव्हल्सकडून भाड्यात तिप्पट - चौपट दराने वाढ

ST Strike: पुण्यात प्रवाशांची होतीये लूट; खासगी ट्रॅव्हल्सकडून भाड्यात तिप्पट - चौपट दराने वाढ

Next

पुणे: राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा. या तसेच इतर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संघटना आणि राज्य सरकार यांच्यात बोलणी सुरू आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका पुणे, मंबईतून दिवाळीनिमित्त गावाकडे गेलेला नागरिकांना बसत आहे. सोमवार (दि.८) पासून पुन्हा ते मुंबई-पुण्याकडे परतू लागले आहेत. मात्र, खासगी कॅब, ट्रॅव्हल्सने सर्वसामान्य प्रवाशंची लूट सुरू केली आहे.

एसटी गाड्यांचे मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद उस्मानाबाद, बीड, लातूरसाठी साधरण २०० ते ५०० रूपयांच्या दरमान्य भाडे आहे. मात्र, संपामुळे प्रवाशांना आपआपल्या गावावरून पुणे, मुंबईकडे येण्यासाठी अक्षरश: लूट सुरू झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्स, कॅब वाल्यांनी याचा गैरफायदा घेत गाडीभाड्यात तिप्पट-चौपट दर केले आहे. 

खासगी ट्रॅव्हल्सचे वाढीव दर

शिवाजीनगर ते अमरावती १५०० रूपये
पुणे ते उस्मानाबाद ११०० रूपये
पुणे ते लातूर १२०० रूपये
पुणे ते बीड १००० रूपये
पुणे ते वर्धा १२०० रूपये
पुणे ते नाशिक ५०० ते ६०० रूपये
पुणे ते नागपूर १५०० ते १८०० रूपये
पुणे ते औरंगाबाद ७०० रूपये
पुणे ते मुंबई ६०० ते ७००

पुण्यात दिवसभर वाहतूक सुरूळीत

राज्यभरातील अनेक एसटी डेपो संपामुळे बंद करण्यात आले होते. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील नारायणगाव आणि खेड (राजगुरूनगर) वगळता अन्य सर्व आगारामधून नियमितपणे गाड्या सुरू होत्या. बाहेरूनही अनेक गाड्या प्रवाशांनी भरून येत होत्या. तर पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातून नियमित तसेच सुरळीतपणे सुरू होती.

Web Title: st strike effect on pune passengers private travels increase ticket rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.