एसटी-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, भीमाशंकर परिसरातील अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 01:44 PM2024-06-11T13:44:20+5:302024-06-11T13:44:43+5:30

एसटी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ओम संदीप लोहकरे (वय १९) याचा जागीच मृत्यू झाला...

ST-Two-wheeler youth dies in two-wheeler accident, accident in Bhimashankar area | एसटी-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, भीमाशंकर परिसरातील अपघात

एसटी-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, भीमाशंकर परिसरातील अपघात

तळेघर (पुणे) : श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसटी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ओम संदीप लोहकरे (वय १९) याचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मंचर-भीमाशंकर रस्त्यावर राजपूर गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या भक्तनिवासासमोर मंचर आगाराची एसटी बस (एमएच ०६ एस ८३९७) ही पुण्यावरून भीमाशंकरकडे जात होती. तर म्हतारबाचीवाडी येथून ओम संदीप लोहकरे हा तरुण दुचाकी क्रमांक (एमएच १४ एफव्ही २४१५) घेऊन तळेघरच्या दिशेने निघाला होता.

भीमाशंकर भक्तनिवासासमोर एसटी बसही भरधाव वेगामध्ये असताना दुचाकी स्वरास बसच्या मागील बाजूचा कट लागला. यामध्ये दुचाकीस्वार रस्त्यावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती घोडेगाव पोलिस स्टेशनला मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसटीचा चालक नीलेश सखाराम भोर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तपास घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर करीत आहेत.

Web Title: ST-Two-wheeler youth dies in two-wheeler accident, accident in Bhimashankar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.