एसटीअभावी विद्याथ्र्याचे हाल

By admin | Published: September 19, 2014 11:34 PM2014-09-19T23:34:16+5:302014-09-19T23:34:16+5:30

महाविद्यालयीन विद्याथ्र्यांची एसटीअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण-शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून द्यावी,

Stable School Stills | एसटीअभावी विद्याथ्र्याचे हाल

एसटीअभावी विद्याथ्र्याचे हाल

Next
शेलपिंपळगाव : महाविद्यालयीन विद्याथ्र्यांची एसटीअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण-शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, एसटी आगार व्यवस्थापन विभाग यासंदर्भात कुठलीही ठोस व्यवस्था करत नसल्याने शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांमधून नाराजीची भावना व्यक्त होऊ लागली आहे. 
  शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने खेडच्या पूर्व भागातील सुमारे 1क् ते 12 गावांमधील विद्याथ्र्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याचा सर्वाधिक फटका महाविद्यालयीन मुलींना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या मार्गावर शालेय वेळेत बसच्या फेर्या एसटी आगाराने बंद केल्याने ही समस्या उद्भवली आहे. मात्र, आगार व्यवस्थापन गाडी सुरु असल्याचे सांगितले जाते, तर विद्यार्थी गाडी उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत.
याविषयी बहुळमधील शालेय विद्याथ्र्यांनी आगार व्यवस्थापनाला मागणीचे लेखी निवेदन दिले आहे. मात्र, राजगुरू आगार व्यवस्थापन विभागाकडून विद्याथ्र्यांच्या मागणीला वाटण्याच्या अक्षदा लावल्या जात असल्याने विद्याथ्र्यांकडून नाराजीचे सूर निघू लागले आहेत. राजगुरू आगार व्यवस्थापनाने विद्याथ्र्यांच्या मागणीचा लवकरात-लवकर विचार करून यावर तोडगा काढावा, नाहीतर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल ,अशी भूमिका या भागातील पालक व विद्याथ्र्यांनी घेतली आहे. 
दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान नव्याने एसटी सुरु करावी, अशी मागणी बहुळ येथील सारिका पानसरे, पूजा साबळे, नेहा तांबे, उज्वला गाडे, पूजा दौंडकर, शारदा मोहिते, श्वेता देशमुख, नेहा साबळे, प्राजक्ता साबळे, शुभम साबळे, सागर थोरात, अविराज मोरे, शेलपिंपळगावचे माजी उपसरपंच शरद मोहिते, बहुळचे उपसरपंच सुनील साबळे, ग्रामपंचायत सदस्य धैर्यशील पानसरे, सयाजीराजे मोहिते, पठाणराव वाडेकर, राजाभाऊ साबळे, संजय आरेकर, अविनाश आवटे, जानकु दौंडकर, संभाजी भाडळे, रमेश गोडसे, अतुल कुटे, सर्जेराव मोहिते सर आदीं ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर) 
 
4शालेय व महाविद्यालयीन मुले रस्त्यावरील अवैध वाहतुकीचा आसरा घेऊन घरी जातात. परंतु, मुलींना एसटीचीच वाट पाहत उभे रहावे लागते. दरम्यान टारगट रोमियोंचा नाहक त्रस मुलींच्या पदरी येतो. दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान चाकण चौकात हे चित्र नित्याचेच बनले आहे. 
4चाकण-शिक्रापूर महामार्गावरून खासगी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असते. या वाहतुकीचे बहुतांशी चालक मद्यप्राशन करून वाहतूक करत असतात. शालेय विद्याथ्र्यांना सरकारी वाहन उपलब्ध नसल्याने या अवैध्य खासगी वाहतुकीचा आसरा घेऊन मार्ग काढावा लागतो. परंतु अशा मद्यपी चालकांमुळे विद्याथ्र्यांना जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा 
लागत आहे. 
4‘लोकमत’ने विद्यार्थांच्या प्रवासाची एसटी अभावी होणारी गैरसोयीची व्यथा प्रसिद्ध केल्यानंतर एसटी आगार व्यवस्थापनाने या वृत्ताची दखल घेत या मार्गावर शालेय वेळेत एसटीबस सुरु केली होती. यामुळे विद्यार्थांचा प्रवासाचा मार्ग सुकर झाला होता. परंतु, पाच-सहा दिवसांतच सुरु केलेली ही सेवा बंद केल्याने पुन्हा ‘मागचे दिवस, पुढे आले’ आहेत.    
 
चाकण - शिक्रापूर महामार्गावरील शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थांची प्रवासाची गैरसोय लक्षात घेऊन राजगुरूनगर आगर व्यवस्थापनाने ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ या तत्वावर स. 9.15 ते सायं. 6.45 या वेळेत शटलबस सुरु केली आहे. परंतु कधी-कधी गाडीच्या बिघाडामुळे बससेवा ठप्प होते.
                          - महेंद्र आघाडे, प्रमुख, राजगुरुनगर स्थानक
 
बसअभावी प्रवासास विद्याथ्र्याची गैरसोय होत असून, धोका पत्करून खासगी वाहनाने त्यांना प्रवास करावा लागतो. कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा घरी येण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवासाचा प्रश्न समोर उभा राहतो.  या प्रलंबित समस्याविषयी आगार व्यवस्थापनाकडे बससेवा सुरु करण्याची मागणी पालकांनीही केलेली आहे. मात्र, यावर तोडगा काढला 
जात नाही.
- मोहन तांबे, पालक
 
शाळा, महाविद्यालय सुटल्यानंतर पुन्हा घरी परतण्यासाठी चाकणमधून आमच्या मुलांना बस किंवा एसटी उपलब्ध होत नसल्याने विविध अडचणीचा सामना त्यांना करावा लागतो. प्रवासास वेळेत सरकारी वाहन न मिळाल्याने त्यांना घरी परतण्यास विलंब होत असल्याने आम्हां पालकांनाही काळजी लागून राहते. लवकरात - लवकर यावर उपाय योजने गरजेचे आहे.
- संगीता पानसरे, सुलोचना तांबे 

 

Web Title: Stable School Stills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.