साठलेले रसायन मातीने बुजवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2016 01:21 AM2016-01-20T01:21:59+5:302016-01-20T01:21:59+5:30
पडवी (ता. दौंड) येथील पडवीपाटीजवळ विषारी रसायन सोडण्यात येत असल्याच्या वृत्तामुळे वन विभागाला जाग आली आहे.
वरवंड : पडवी (ता. दौंड) येथील पडवीपाटीजवळ विषारी रसायन सोडण्यात येत असल्याच्या वृत्तामुळे वन विभागाला जाग आली आहे. मंगळवारी (दि. १९) सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, साचलेले केमिकल माती टाकून बुजवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपासून पडवी परिसर व पडवी घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी रासायन सोडण्याचा प्रकार सुरू होता. मध्यतरी पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीमुळे हा प्रकार काही दिवस बंद झाला; मात्र पुन्हा नव्याने सुपे घाट व परिसरामध्ये टँकरद्वारे विषारी केमिकल सोडण्याचा प्रकार सुरू झाला आहे. टँकरचालक उघड्यावर हे विषारी केमिल सोडत आहेत.
(वार्ताहर)