आंबेगाव तालुक्यात उभारणार स्टेडीयम : वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:52+5:302021-01-22T04:11:52+5:30

अवसरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व आंबेगाव तालुका आणि विष्णुकाका हिंगे पाटील स्पोर्ट्स फौंडेशनतर्फे आंबेगाव प्रीमियर लीग २०२० ...

Stadium to be constructed in Ambegaon taluka: Valse Patil | आंबेगाव तालुक्यात उभारणार स्टेडीयम : वळसे पाटील

आंबेगाव तालुक्यात उभारणार स्टेडीयम : वळसे पाटील

Next

अवसरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व आंबेगाव तालुका आणि विष्णुकाका हिंगे पाटील स्पोर्ट्स फौंडेशनतर्फे आंबेगाव प्रीमियर लीग २०२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. आठ दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराणा मंचर, द्वितीय क्रमांक भैरवनाथ स्पोर्ट्स फौंडेशन (पेठ पारगाव) सुवर्णयुग मंचर यांना ५१ हजार रुपये, ४१ हजार रुपये, ३५ हजार रुपये व ३१ हजार रुपये बक्षीस विभागून देण्यात आले. बक्षीस वितरण पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, गोविंद खिलारी, प्रमोद हिंगे, दौलतभाई लोखंडे, किसनराव उंडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक ॲड. प्रदीप वळसे पाटील, सरपंच पवन हिले यांच्या हस्ते करण्यात आले.

आठ दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेचे नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विष्णुकाका हिंगे पाटील स्पोर्ट्स फौंडेशन व उपसरपंच सचिन हिंगे, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक उपाध्यक्ष सचिन हगवणे यांनी केले.

याप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस केक कापून साजरा केला.

छायाचित्र मजकूर: अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील.

Web Title: Stadium to be constructed in Ambegaon taluka: Valse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.