रुबी हॉल क्लीनिक रुग्णालयाचे कर्मचारी आनंदाने भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:00+5:302021-01-17T04:11:00+5:30
लस आली आहे, याचा आनंद आहे. कोणत्याही प्रकारे याची चुकीची अफवा समजात फसरू नये असेच वाटते. ज्यांनी खऱ्या गंभीर ...
लस आली आहे, याचा आनंद आहे. कोणत्याही प्रकारे याची चुकीची अफवा समजात फसरू नये असेच वाटते. ज्यांनी खऱ्या गंभीर परिस्थितीमध्ये काम केले त्यांना लस मिळतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. देशाचा अभिमान वाटत आहे . असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
चौकट
गेटवरून आता येणाऱ्या व्यक्तीचे स्वागत करताना आनंद वाटतोय
गेटवर ड्युटी करण्याचा आजचा खूप वेगळा दिवस आहे. मनामध्ये आनंद वाटत आहे. अतिशय कठीण काळात येथील सर्व स्टाफ ने काम केले आहे. गंभीर वातावरणात काम करताना मनावर दडपण होते. कोरोना काळात गेटवरून आता येणाऱ्या प्रत्येक रुग्ण किंवा व्यक्तीला बघून काळजी वाटायची. मात्र आज ज्या दिवसाची वाट बघत होतो. तो दिसव उजाडला आहे. काळात कोरोना या गंभीर महामारीवर लस आली आहे. ज्यांनी खरे परिश्रम घेतले. परिवारापासून लांब राहिले. त्या डॉक्टरांना लस मिळतेय हा आनंद शब्दांत व्यक्त न करता येणारा आहे. आज गेट वरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत करताना मनांमद्ये आनंद खूप वेगळा आहे.
-नीलिमा पवार, गेट वरील सुरक्षा रक्षक महिला.
कोरोनावरील लस टोचवताना अभिमान वाटत आहे. रुग्णालयाने दिलेली ही सर्वात मोठी संधी समजते. देशाबद्दल अभिमान वाटत आहे. सुरुवातीला दडपण होते. मात्र इंजेक्शन देणे आणि लस देणे यात कोणतेही वेगळेपण जाणवले नाही.
- बेंन्सी बेंन्नी, पहिली लस टो चविणारी परिचारिका.