बारामतीत अस्वच्छ पाणीपुरवठा
By Admin | Published: September 16, 2014 11:07 PM2014-09-16T23:07:10+5:302014-09-16T23:07:10+5:30
सुभाष चौक ते घोडेपीर मशीद व या श्रीराम मंदिर परिसरातील भूमिगत गटार योजनेचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्यामुळे पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी जात आहे.
बारामती : सुभाष चौक ते घोडेपीर मशीद व या श्रीराम मंदिर परिसरातील भूमिगत गटार योजनेचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्यामुळे पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत आहे.
याबाबत तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांच्याकडे लेखी केली. नगराध्यक्षांनी तातडीने ठेकेदारावर कारवाई करून अन्य ठेकेदारामार्फत काम करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या.
इगल कन्स्ट्र्क्शन जानेवारी 2क्14 मध्ये या कामाचे वर्क ऑर्डर दिले आहे. 8 महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत होती. त्याचबरोबर याच परिसरात अस्वच्छता वाढल्याने डासांचे मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.
परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढले. कीटकजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. रस्त्याचे काम अर्धवट पडल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठून राहिले आहेत. बसविलेले चेंबर तुटलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा देखील खोळंबा होतो. तसेच, नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. त्यामुळे ढोले यांनी या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. त्यानुसार नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी तातडीने शहर अभियंत्यांना संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच, त्याने केलेल्या कामाचे बील अदा करू नये, अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर अन्य ठेकेदारामार्फत नियमानुसार काम करून घ्यावे, असे आदेश दिले. त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छता आणि डास निमरूलनासाठी धूर फवारणी आणि जंतू नाशक औषध फवारणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
गटाराचे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात..
ठेकेदाराने रस्ते खोदाई करून अर्धवट काम ठेवले आहे. याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या, वीज महावितरणच्या वाहिन्या त्याचबरोबर जुन्या गटारी देखील वाहत आहेत. खोदकाम करताना काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे गटाराचे पाणी त्यामध्ये मिक्स होते. त्यामुळे अस्वच्छ पाणी या भागातील लोकांना मिळत आहे. सुभाष चौक, खाटिक गल्ली, कसाब गल्ली, घोडेपीर मशीद, श्रीराम मंदिर परिसर, जुनी भाजी मंडई कोपरा या भागातील नागरिकांना त्याचा त्रस होतो.