बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर डाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:38+5:302021-07-01T04:08:38+5:30

टाकळी हाजी: खराब हवामानामुळे हवेतील आर्द्रता वाढल्याने डाळिंबावर डाग येण्याचे प्रमाण वाढू आले आहे. अशा फळांमुळे बाजार कमी ...

Stains on pomegranate due to changing climate | बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर डाग

बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर डाग

Next

टाकळी हाजी: खराब हवामानामुळे हवेतील आर्द्रता वाढल्याने डाळिंबावर डाग येण्याचे प्रमाण वाढू आले आहे. अशा फळांमुळे बाजार कमी झाला असून अपेक्षित असे दरसुद्ध मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे बेट भागातील उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत.

शिरूर तालुक्यातील बेटभागात टाकळी हाजी , कवठे येमाई , मलठण ,वडनेर, फाकटे , चांडोह ,जांबूत , निमगाव दूडे , रावडेवाडी , आमदाबाद, अण्णापूर या गावांमध्ये बहुतांश प्रमाणात डाळिंबाच्या बागा आहेत.

डाळिंब पिकासाठी नऊ महिने काळजी घ्यावी लागते. साधारणपणे चारशे ते पाचशे रुपये प्रति झाडास खर्च केल्यास उत्पादन चांगले मिळते. या भागातील बहुतेक माल निर्यात केला जातो. सध्या बऱ्याच मालाची विक्री झाली असून ज्या बागा शिल्लक आहेत त्यांची फळे तोडणीस आली आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे डाळिंबाला चांगला भाव मिळाला नाही. त्यात अनेक बागा तेल्या रोगामुळे काढण्यात आल्या आहेत. याशिवाय बदलत्या हवामानाचाही फटकाही बसत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने फळांवर डाग पडले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून फळांचा दर्जा चांगला असला, तरी दर देत नाहीत. त्यामुळे उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण डाळिंब विक्रीतून उत्पादन खर्चही बाहेर पडत नसल्याने शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊनच व्यवहार करावेत असे डाळिंब मार्गदर्शक कैलास गावडे, योगेश हिलाल ,बाळासाहेब खटाटे,यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन टाकळी हाजीचे डाळिंब उत्पादक विक्रम घोडे,संतोष गावडे, योगेश हिलाळ,नारायण कांदळकर, राहुल रसाळ,शहाजी सोदक,नितीन थोरात यांनी केले आहे.

३० टाकळी हाजी

Web Title: Stains on pomegranate due to changing climate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.