‘अनाथांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा’

By admin | Published: January 26, 2016 01:40 AM2016-01-26T01:40:29+5:302016-01-26T01:40:29+5:30

आई-वडिलांच्या मायेपासून दुरावलेल्या अनाथ मुलांचे हित साध्य करण्याकरिता त्यांच्या पाठीवरून मायेची झालर फिरवून त्यांना साथ द्या, असे आवाहन सिनेअभिनेत्री व जनहित संघटनेच्या

'Stand firm with the orphans' | ‘अनाथांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा’

‘अनाथांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा’

Next

चाकण : आई-वडिलांच्या मायेपासून दुरावलेल्या अनाथ मुलांचे हित साध्य करण्याकरिता त्यांच्या पाठीवरून मायेची झालर फिरवून त्यांना साथ द्या, असे आवाहन सिनेअभिनेत्री व जनहित संघटनेच्या कार्याध्यक्षा सायली शिंदे यांनी केले.
येथील निर्मल बालविकास संस्थेतील अनाथ मुलांना जनहित संघटनेच्या वतीने मोफत शालेय साहित्यवाटप, अन्नदान व संस्थेच्या संचालिका गीता सावंत यांचा नागरी सत्कार सायली शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी आयोजिण्यात आलेल्या एका भरगच्च कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होत्या. जनहित संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत अलगुडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी मनसेचे राज्य सरचिटणीस विनोद वाघमारे, एसके आर्टचे दिग्दर्शक शिवा बागूल, दीपस्तंभ क्रिएशनचे दीपक शिंदे, मनसेचे दिघी शाखाध्यक्ष दत्ता घुले, बाळासाहेब लोंढे, रमेश पवार, बाळासाहेब कुतवळ, राजू बोराटे, अशोक जोगदंड, राजू सोनवणे, संतोष पोळ, रामदास गोसावी, हुसेन मुलाणी, प्रकाश साळुंके, दिनेश तिवारी, भाऊसाहेब गव्हाणे, रंजना अलगुडे, प्रमिला अलगुडे, दीपाली अलगुडे, वैशाली सावंत, कीर्ती हुंडारे आदींसह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष हनुमंत अलगुडे म्हणाले, ‘‘समाजाच्या कल्याणसाठी ही संस्था जोपर्यंत विश्वाला गती आहे तोपर्यंत निश्चितपणे टिकून राहील, यात तिळमात्र शंका नाही. भविष्यकाळात या संस्थेला लागणारे सर्व सहकार्य निश्चितपणे करण्याचा आमचा मानस राहील.’’
अशोक जोगदंड यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमिला अलगुडे यांनी आभार मानले.
(वार्ताहर)

Web Title: 'Stand firm with the orphans'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.