स्टार १०६१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:35+5:302021-08-19T04:15:35+5:30

ऑनलाईन सुविधा नावालाच; आरटीओ कार्यालय एजंटाच्या विळाख्यात एजंटाशिवाय आरटीओ कार्यालयात काडीही हालत नाही लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे ...

Star 1061 | स्टार १०६१

स्टार १०६१

googlenewsNext

ऑनलाईन सुविधा नावालाच; आरटीओ कार्यालय एजंटाच्या विळाख्यात

एजंटाशिवाय आरटीओ कार्यालयात काडीही हालत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : काय करायचे... माझे लर्निंग लायसन्स हरवले आहे, नवीन काढायचे... आम्ही देतो काढून... तुम्ही फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स काढून आणा... मी ऑनलाईन अर्ज केला नाही... काही हरकत नाही... सर्व काम होईल... किती खर्च येईल... परीक्षा देणार का... अवघड असते का... नापास झाला तर लायसन्स मिळणार नाही... परीक्षा न देता किती होतील... पण असे चालते का... जास्त चौकशी कशाला करता... पैसे दिले की सर्व काम होते.. लर्निंग लायसन्ससाठी १५०० ते १८०० रुपये लागतील... पर्मनंट पण पाहिजे असेल तर २८०० रुपये... पुण्यातील आरटीओ ऑफिसमध्ये कोणतेही काम करण्यासाठी नागरिक केल्यास चौकशी ऑफिसपर्यंत पोहचेपर्यंत नऊ-दहा एजंट तरी तुम्हाला गाठून तुमचे काम करून देतो म्हणून सांगतात. ‘लोकमत’च्यावतीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात केलेल्या रियालिटी चेकमध्ये ही माहिती समोर आली.

आरटीओ कार्यालय एजंटमुक्त करण्यासाठी ऑनलाईन सुविधांसह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु नागरिकांची संगणक निरक्षरता, ऑनलाईन अर्ज भरले तरी परीक्षा, कागदपत्रे जमा करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाणे, कार्यालयातील प्रचंड गर्दी, कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मिळणारी तुटक उत्तरे आणि आरटीओ कर्मचारी-अधिकाऱ्यांचे एजंटांशी असलेले लागेबंध यामुळेच लोकांना एजंटांची मदत घ्यावी लागत असल्याचे निदर्शनास आले.

------

लर्निंग लायसन्स

लर्निंग लायसन्सची सर्व सुविधा ऑनलाईन केली आहे. पण परीक्षा देण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागते. ऑनलाईन परीक्षा देण्याची सोय उपलब्ध असली तरी अनेक तांत्रिक अडचण येत असल्याने लोक आरटीओ कार्यालयात जाऊनच परीक्षा देणे पसंत करतात. यामुळेच कागदपत्र तपासताना त्रुटी काढणे, कागदपत्र तपासणीसाठी दोन-तीनसाठी रांगेत थांबणे यामुळेच लोक एजंटांकडे जातात. पण १४८ रुपयांत मिळणाऱ्या लर्निंग लायसन्ससाठी हजार-दीड हजार खर्च करावा लागतो.

-----

वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट -या कामासाठी ऑफिशियल खर्च - गाडीच्या प्रकारानुसार वेगळे दर ६०० ते १२००

- एजंटांना किती द्यावे लागतात : ३ ते ६ हजार

ब) पर्मनंट लालसन्स - या कामासाठी ऑफिशियल खर्च : ११६६

- एजंटांना द्यावे लागतात २८००

क) गाडी दुसऱ्याच्या नावावर करण्यासाठी ऑफिशियल खर्च २४०, एजंटांना द्यावे लागतात १५०० ते २१००

-----

आरटीओ कार्यालयाचा भूलभुलैया!

आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्ससाठी, पर्मनंट लायसन्स अथवा इतर कोणत्याही कामासाठी नक्की कुणाला भेटायचे, काय कागदपत्रे लागतील, काय व कसा अर्ज करावा याची माहिती सहजासहज मिळत नाही. अनेक वेळा माहिती देणारी व्यक्तीच जागेवर नसते. परंतु ही सर्व कमी एजंट अत्यंत तत्परतेने पूर्ण करतात.

--------

एजंटकडून गेले की झटपट आणि विनातक्रार

नागरिकांनी स्वतःहून अर्ज केले तर अनेक अडचणी येतात. कागदपत्रांच्या त्रुटी काढल्या जातात किंवा अन्य अनेक कारणे दिली जातात, पण एजंटमार्फत गेला तर विनासायास व त्वरित काम होते. एजंट असेल तर परीक्षा देण्याची देखील गरज नाही.

--------

एजंट नाही ते तर नागरिकांचे रिप्रेझेंटेटिव्ह

आरटीओ कार्यालयांच्या आवारात सर्वत्र एजंटांची टोळकीच्या टोळकी बसलेली असतात. कार्यालयाच्या बाहेरच नाही तर थेट कार्यालयात देखील अनेकजण लोकांची मदत करताना दिसतात. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले ते एजंट नाही तर लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. शासनाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या असून त्याचा उपयोग करावा.

- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Star 1061

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.