Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:02 PM2024-10-23T15:02:04+5:302024-10-23T15:02:38+5:30

पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन अन् जलसंवर्धनात केले उत्कृष्ट काम

Star of National Water Award under Pune Municipal Corporation | Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा

पुणे : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये शहरी विभागात पुणे महापालिकेला तृतीय क्रमांक मिळाला. दिल्ली येथील विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ताे प्रदान करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. राजेद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

शहराच्या सर्व भागांत समान दाबाने आणि कायम पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेच्या वतीने समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. २०४७ पर्यंतचा विचार करून शहराची लोकसंख्या ५० लाख गृहीत धरत या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेनुसार शहरातील पाणी वितरणामधील ४० टक्के गळती कमी करण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शहरातील ७६ टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवले जाते. शहरात दररोज चार तास पाणीपुरवठा होतो. दरडोई १५७ लिटर पाणीपुरवठा होतो. शहरातील ४३ टक्के नळजोडांवर मीटर बसविण्यात आले आहेत. पुणेकरांना १०० टक्के दर्जेदार पाणी पुरवले जाते. तसेच पाणीपुरवठ्याबाबतच्या ८५ टक्के तक्रारींचे निवारण केले जाते. पाणीपट्टीच्या वसुलीचे प्रमाण ६० टक्के असून, महसूल न मिळणाऱ्या पाण्याचे (एनआरडब्ल्यू) प्रमाण ३० टक्के आहे.

पालिका करते ६० टक्के पाण्याचा पुनर्वापर

शहरात १०० टक्के रहिवासी भागात शौचालये असून, शौचालयांची एकूण संख्या सहा लाख १९ हजार ८२२ आहे. यात ८२२ कम्युनिटी, तर २९२ पब्लिक टॉयलेट्सचा समावेश आहे. शहराच्या विविध भागांत १९४ मुताऱ्या आहेत. शहरातील ९८ टक्के भागात सांडपाणी वाहिन्यांचे जाळे आहे. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या ७५ टक्के सांडपाण्यावर (४७७ दशलक्ष लिटर प्रतिदिन) प्रक्रिया केली जाते. यापैकी ६० टक्के पाण्याचा पुनर्वापर कृषी, सिंचन, बांधकाम, उद्याने, जेंटिंग मशीन आदी माध्यमातून केला जात आहे.

Web Title: Star of National Water Award under Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.