आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला २५ हजार रुपये पेन्शन सुरू करा; शेतकरी संघटनेकडून पुणे विधान भवनवर जवान-किसान मोर्चा

By अजित घस्ते | Published: July 19, 2024 06:23 PM2024-07-19T18:23:19+5:302024-07-19T18:24:58+5:30

आमदार आणि खासदारांचे निवृत्ती वेतन बंद करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना द्यावे

Start a pension of Rs 25 thousand to the families of farmers Jawan Kisan Morcha at Pune Vidhan Bhavan by Farmers Association | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला २५ हजार रुपये पेन्शन सुरू करा; शेतकरी संघटनेकडून पुणे विधान भवनवर जवान-किसान मोर्चा

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला २५ हजार रुपये पेन्शन सुरू करा; शेतकरी संघटनेकडून पुणे विधान भवनवर जवान-किसान मोर्चा

पुणे: आमदार आणि खासदारांचे निवृत्ती वेतन बंद करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला प्रति महिना पंचवीस हजार रूपये पेन्शन सुरू करावी, शेतमालावरील निर्यातबंदी रद्द करावी, शहीद जवानांच्या परिवाराला शासनाच्या नियमाप्रमाणे तात्काळ जमीन पट्टे वाटप करून त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवांमध्ये सामाविष्ट करून घेण्यात यावे, यासह जवान आणि किसानांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. 

 'जय जवान जय किसान'चा नारा घोषणा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मोर्चाव्दारे मांडण्यात आल्या. यावेळी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष रघुनाथ पाटील, भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे तसेच राज्यभरातील शेतकरी, कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी , वीरपत्नी आणि जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि दुचाकी घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. 

प्रमुख मागण्या : 

- आमदार आणि खासदारांचे निवृत्ती वेतन बंद करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना द्यावे.
- ऊसाला प्रतिटन पाच हजार रूपये भाव द्यावा नाहीतर, इथेनॉल आणि साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द करावी.
- सर्व कर्ज, विजबील आणि पाणीपट्टी करातून शेतकऱ्यांना मुक्त करावे
- गाईच्या दुधाला डिझेल आणि म्हशीच्या दुधाला पेट्रोल इतका प्रती लीटर भाव दयावा.
- शासनाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
- सैनिकांच्या भरतीमधील अटी, शर्थी, शिथील करून १५ टक्के आरक्षित जागा तात्काळ भरण्यात याव्यात.
- सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे, सैनिकांना मिळालेल्या शासनाच्या वर्ग २ च्या जमीनींना वर्ग १ मध्ये रूपांतरीत करावे, 
- सैनिकांचे चार प्रतिनिधी विधानपरीषद आणि राज्यसभेत पाठवावे.
 - यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. व नीट परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे.

Web Title: Start a pension of Rs 25 thousand to the families of farmers Jawan Kisan Morcha at Pune Vidhan Bhavan by Farmers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.