'डीटीई' अंतर्गत सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करा : 'अभाविप'चे पुण्यात 'ढोल बजाव'आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 03:47 PM2020-11-05T15:47:12+5:302020-11-05T15:48:09+5:30

महाराष्ट्रातील विद्यार्थी आज संभ्रमात आहे. प्रवेश प्रक्रिया कधी सुरू करणार आहे याची तो वाट पाहत आहे

Start admission process for all courses under DTE: 'Dhol Bajav' movement by 'Abvp' in Pune | 'डीटीई' अंतर्गत सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करा : 'अभाविप'चे पुण्यात 'ढोल बजाव'आंदोलन

'डीटीई' अंतर्गत सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करा : 'अभाविप'चे पुण्यात 'ढोल बजाव'आंदोलन

Next

पुणे : राज्यातील एमबीए, अभियांत्रिकी, बीएड-एमएड व विविध अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने (अभाविप)'ढोल बजाव'आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने विद्यार्थी हिताचा तात्काळ निर्णय करावा सर्व निकाल त्वरित जाहीर करून प्रवेश प्रक्रिया चालू करावी म्हणून अभाविपकडून  'ढोल बजाओ' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. 

राज्यातील व्यवस्थापन शास्त्र (MBA) च्या प्रवेश परीक्षा होऊन २३६ दिवस होऊन गेले आहे. निकाल लागून १६६ दिवस झालेत तरीदेखील कोणत्याच प्रकारची प्रवेश प्रक्रिया शासनाने सुरू झालेली नाही. आयआयएम तसेच खाजगी महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया संपवून वर्ग देखील ऑनलाईन पद्धतीने सुरू केले आहे. महाराष्ट्रात दरवर्षी अंतिम वर्षाचे निकाल लागण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते. परंतु आजपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.


 

अभियांत्रिकी, विधी, संगणक शास्त्र, वास्तूकला शास्त्र, बीएड, एमएड व इतर अभ्यासक्रमात शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची संबंधित प्रवेश परीक्षा (MAH-CET) अनेक महिने उलटून सुद्धा अद्यापही प्रशासनाने निकाल जाहीर केलेले नाही. कोणत्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया (CAP Rounds) चालू न झाल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच ह्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट साठी अनेक अडचणी निर्माण होणार आहेत कारण महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये महाविद्यालये सुरू देखील झालेले आहेत. 

अनिल ठोंबरे म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी  विद्यार्थ्यांनी व्यस्थापन शास्त्र, (MBA) १,२००००, बीएड ,१,२०,००० विधी अभ्यासक्रमासाठी ४४,००० , अभियांत्रिकी ४,३५,६५३ इत्यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया अर्ज भरला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी आज संभ्रमात आहे. प्रवेश प्रक्रिया कधी सुरू करणार आहे याची विद्यार्थी वाट पाहत आहे. महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रवेशप्रक्रिया चालू केली नाही तर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व अभाविप संपूर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्रपणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: Start admission process for all courses under DTE: 'Dhol Bajav' movement by 'Abvp' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.