खराडीत आणखी लसीकरण केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:30+5:302021-04-21T04:11:30+5:30
पुणे : पुणे महापालिकेला मागणी केल्यानुसार खरडीतील महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. मात्र हे केंद्र आपुरे पडत ...
पुणे : पुणे महापालिकेला मागणी केल्यानुसार खरडीतील महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. मात्र हे केंद्र आपुरे पडत असून खराडीतील लोकसंख्या पाहता आणखी तीन-चार लसीकरण केंद्र सुरू करण्याची गरज आहे. तशी मागणी महापालिकेला केली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष भरणे यांनी सांगितले.
भरणे म्हणाले, की १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार खराडीतील लोकसंख्या पाहता या लसीकरण मोहीम राबविण्याएवढी या सध्याच्या केंद्राची क्षमता नाही. या परिसरात मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या अधिक आहे. तसेच बांधकाम कामगारांची, हातावर पोट असलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यांना मोफत लस मिळणे हे अत्यावश्यक आहे. लसीकरण मोहीम जेवढ्या तीव्र गतीने राबविली जाईल. तेवढ्या प्रमाणात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणणे शक्य होईल. त्यामुळे महापालिकेने अधिकचा वेळ न लावता पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून आणखी किमान तीन ते चार लसीकरण केंद्र सुरू करण्याची गरज आहे. यापूर्वी खराडीत लसीकरण केंद्र करण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानुसार महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू केले आहे.