सुषमा स्वराज यांच्या नावाने पुरस्कार सुरु करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 07:46 PM2019-08-19T19:46:30+5:302019-08-19T19:46:42+5:30

स्वराज यांनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाला एक मानवी चेहरा दिला...

Start the award in the name of Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांच्या नावाने पुरस्कार सुरु करा

सुषमा स्वराज यांच्या नावाने पुरस्कार सुरु करा

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वराज यांना श्रध्दांजली

पुणे : माजी परराष्ट्र मंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे प्रतिक होत्या. त्यांनी आपल्या कणखर नेतृत्वाच्या जोरावर देश-विदेशात आपला दबदबा निर्माण केला. देशातील सर्व प्रामुख्याने राजकारणातील महिलांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला. अशा या नेत्याच्या नावाने पुणे महापालिकेत महिला सक्ष्मीकरणाची योजना व पुरस्कार सुरु करण्याची मागणी करत सदस्यांनी सुषमा स्वराज यांना श्रध्दांजली वाहिली.
    स्वराज यांच्या बद्दल बोलताना सदस्यांनी सांगितले की, स्वराज यांनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाला एक मानवी चेहरा दिला. राजकारणातील स्त्रीयासाठी आदर्श नेत्या होत्या. त्याच्या प्रत्येक कृतीमधून खानदानी पण पदोपदी दिसून येत होता. अत्यंत दिलखुलास व्यक्तीमत्व होते. परराष्ट्र मंत्री असताना विविध देशांमध्ये अडकलेल्या अनेक सर्वसामान्य व्यक्तींना त्यांनी मदत केली. यामुळेच संकटमोचक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. तसेच सोशलमिडियाचा देखील त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी उपयोग केला. आपल्या कणखर नेतृत्वाच्या जोरावर वेगळाच दरारा निर्माण केला होता. यामुळेच स्वराज यांच्या नावाने महापालिकेमध्ये महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र योजना सुरु करावी. तसेच विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणा-या महिलांना स्वराज यांच्या नावाने पुरस्कार सुरु करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. यामध्ये गोपाळ चिंतल, ज्योत्स्ना एकबोटे, माधुरी सहस्त्रबुध्दे,  नंदा लोणकर, पृथ्वीराज सुतार, अविनाश बागवे, वसंत मोरे, दिलीप बराटे, श्रीनाथ भिमाले यांच्यासह महापौर मुक्ता टिळक यांनी श्रध्दांजली वाहिली.
-----------------------
सांगली- कोल्हापूरातील पूरग्रस्तांना भरघोस मदत करा
सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना देखील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेता श्रध्दांजली वाहन्यात आली. यावेळी महापालिकेच्या सर्व सदस्यांच्या वार्डस्तरीय निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ही मदत कमी असून, महापालिकेने पूरग्रस्तासाठी भरघोस मदत करावी, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली.

Web Title: Start the award in the name of Sushma Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.